LIVE: महाराष्ट्र सरकारने नागपूर हिंसाचारातील पीडितांना आर्थिक मदत दिली
Maharashtra Marathi Breaking News Live Today : औरंगजेबाच्या थडग्यावरून सुरू असलेल्या वादानंतर नागपुरात उसळलेल्या हिंसाचारातील पीडितांना दिलासा मिळू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने शहरातील दंगलग्रस्तांच्या बँक खात्यात मदत निधी हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या इरफान अन्सारीच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
औरंगजेबाच्या थडग्यावरून सुरू असलेल्या वादानंतर नागपुरात उसळलेल्या हिंसाचारातील पीडितांना दिलासा मिळू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने शहरातील दंगलग्रस्तांच्या बँक खात्यात मदत निधी हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या इरफान अन्सारीच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. सविस्तर वाचा…
लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केल्यानंतर, वक्फ दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली. आता वक्फ दुरुस्ती विधेयक कायदा बनले आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारनंतर देवेंद्र फडणवीस सरकारही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. महाराष्ट्र सरकार वक्फ जमिनीवरील अतिक्रमणे काढून टाकण्याची आणि त्यात सहभागी असलेल्या लोकांवर आणि ट्रस्टवर कारवाई करण्याची योजना आखत आहे. सविस्तर वाचा…