LIVE: कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनले

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र केसरी स्पर्धा २ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथे पार पडली. कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ यांनी कुस्तीगीर महेंद्र गायकवाडचा पराभव करून महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला आहे. या सामन्यात पुण्याचा …

LIVE: कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनले

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र केसरी स्पर्धा २ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथे पार पडली. कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ यांनी कुस्तीगीर महेंद्र गायकवाडचा पराभव करून महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला आहे. या सामन्यात पुण्याचा कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरला आहे. कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळने अंतिम फेरी जिंकून ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा जिंकली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी कुलीला अटक केली. सविस्तर वाचा भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या युती असलेल्या महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वाचा

Go to Source