राज्यात 67,557 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

राज्यातील (maharashtra) 990 क्रिटीकल मतदान (maharashtra election 2024) केंद्रांवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 500 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्रांपैकी 67,557 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग प्रक्रिया राबवण्यात आली.  तर मुंबईत 10,117 मतदान (election) केंद्रावर वेब कास्टिंग प्रक्रिया पार पडली. मुंबईत 100 टक्के वेब कास्टिंग (web casting) झाले. वेब कास्टिंगच्या मदतीने मतदान केंद्रावरचे चित्रिकरण रेकॉर्ड केले जाते. ज्याच्या मदतीने निवडणूक अधिकारी मतदान केंद्रावरील कुठल्याही क्षणाचे चित्रिकरण नंतर पाहू शकतात.    खबरदारीचा उपाय म्हणून एक लाखाहून अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 85 वर्षांवरील मतदार आणि अपंग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरात आलेल्या अर्जांपैकी 86 हजार 462 अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना घरी बसून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अपंग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय करण्यात आली आहे.हेही वाचा निवडणूक केंद्रावर कार्यकर्त्यांची कसरत मुंबईतील शाळांना 21 नोव्हेंबरला सुट्टी देण्याची मागणी

राज्यात 67,557 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

राज्यातील (maharashtra) 990 क्रिटीकल मतदान (maharashtra election 2024) केंद्रांवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 500 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्रांपैकी 67,557 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग प्रक्रिया राबवण्यात आली. तर मुंबईत 10,117 मतदान (election) केंद्रावर वेब कास्टिंग प्रक्रिया पार पडली. मुंबईत 100 टक्के वेब कास्टिंग (web casting) झाले.वेब कास्टिंगच्या मदतीने मतदान केंद्रावरचे चित्रिकरण रेकॉर्ड केले जाते. ज्याच्या मदतीने निवडणूक अधिकारी मतदान केंद्रावरील कुठल्याही क्षणाचे चित्रिकरण नंतर पाहू शकतात.   खबरदारीचा उपाय म्हणून एक लाखाहून अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 85 वर्षांवरील मतदार आणि अपंग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.त्यानुसार राज्यभरात आलेल्या अर्जांपैकी 86 हजार 462 अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना घरी बसून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अपंग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय करण्यात आली आहे.हेही वाचानिवडणूक केंद्रावर कार्यकर्त्यांची कसरतमुंबईतील शाळांना 21 नोव्हेंबरला सुट्टी देण्याची मागणी

Go to Source