महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईत तीन लाख नवीन मतदार
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मुंबईतील (mumbai) विधानसभा निवडणुकीसाठी (maharashtra vidhan sabha election) मतदारांची संख्या 2,91,087 ने वाढली आहे. यंदा मुंबईत 1 कोटी 40 लाखांहून अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या वाढली असली तरी मतदानाचा टक्का वाढवण्यात प्रशासनाला यश येईल की नाही हे मतदानाच्या (voters) दिवशीच कळणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत सुमारे 47 टक्के मतदान झाले होते.यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका (BMC) आयुक्तांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निवडणूक घेण्याची संपूर्ण जबाबदारी मुंबई महापालिका प्रशासनावर आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मतदान व मतमोजणीच्या तयारीची माहिती दिली. मुंबई महापालिकेचे 60 हजार कर्मचारी व अधिकारी आणि पोलिस दलातील 25,696 कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबईतील एकूण 36 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघ शहरी भागात आणि 26 मतदारसंघ उपनगरात आहेत. एकूण 36 मतदारसंघात 420 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये शहरी भागात 105 उमेदवार, तर उपनगरात 315 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण 10 हजार 117 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.हेही वाचामुंबई : यंदाच्या मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंगमतदानासाठी 30 हजारांहून अधिक पोलिस तैनात
Home महत्वाची बातमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईत तीन लाख नवीन मतदार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईत तीन लाख नवीन मतदार
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मुंबईतील (mumbai) विधानसभा निवडणुकीसाठी (maharashtra vidhan sabha election) मतदारांची संख्या 2,91,087 ने वाढली आहे. यंदा मुंबईत 1 कोटी 40 लाखांहून अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदारांची संख्या वाढली असली तरी मतदानाचा टक्का वाढवण्यात प्रशासनाला यश येईल की नाही हे मतदानाच्या (voters) दिवशीच कळणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत सुमारे 47 टक्के मतदान झाले होते.
यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका (BMC) आयुक्तांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निवडणूक घेण्याची संपूर्ण जबाबदारी मुंबई महापालिका प्रशासनावर आहे.
या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मतदान व मतमोजणीच्या तयारीची माहिती दिली. मुंबई महापालिकेचे 60 हजार कर्मचारी व अधिकारी आणि पोलिस दलातील 25,696 कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईतील एकूण 36 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघ शहरी भागात आणि 26 मतदारसंघ उपनगरात आहेत. एकूण 36 मतदारसंघात 420 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
यामध्ये शहरी भागात 105 उमेदवार, तर उपनगरात 315 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण 10 हजार 117 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.हेही वाचा
मुंबई : यंदाच्या मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग
मतदानासाठी 30 हजारांहून अधिक पोलिस तैनात