मोतीलाल चौक भेंडीबाजार येथे सोमवारी महाप्रसाद

बेळगाव : मोतीलाल चौक, भेंडीबाजार येथील सिद्धिविनायक ट्रस्टच्यावतीने सोमवार दि. 22 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बेळगावमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12.45 वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार असून नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष रोहित रावळ यांनी केले आहे. भेंडीबाजार, पांगुळ गल्ली, भोई गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, […]

मोतीलाल चौक भेंडीबाजार येथे सोमवारी महाप्रसाद

बेळगाव : मोतीलाल चौक, भेंडीबाजार येथील सिद्धिविनायक ट्रस्टच्यावतीने सोमवार दि. 22 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बेळगावमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12.45 वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार असून नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष रोहित रावळ यांनी केले आहे. भेंडीबाजार, पांगुळ गल्ली, भोई गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली, आझाद गल्ली, कसाई गल्ली, माळी गल्ली, मेणसी गल्ली, भातकांडे गल्ली यांच्या सहकार्याने महाप्रसाद होणार आहे. 20 हजारहून अधिक नागरिकांना महाप्रसाद देण्याची तयारी मंडळाकडून केली जात आहे. भाविकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील व्यापारी हनुमानसिंग ठाकुर, महेश पोरवाल, मदन तिवारी, जगतराम प्रजापत, हरिसिंग ठाकुर, प्रभू प्रजापत, मिलिंद बसरीकट्टी यांसह इतर उपस्थित होते.