महालक्ष्मीला प्रार्थना ”चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे”

चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे
महालक्ष्मीला प्रार्थना ”चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे”

चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे २

आणि दिव्य किरण तुझे २ अंतरी शिरावे

 

कुठुनि कुठे सांग जाशि २ उधळित आनंद राशि २

आळवीत, गौरवीत दीप राग भावे

चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे

 

श्रीहरिचे नाभिकमल २ ब्रह्म्याचे प्रज्ञास्थल २

तृतिय रूद्रनयन तूचि २ प्रकटिशी प्रभावे

चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे

 

शककर्त्या शुभवचनी २ प्रमदांच्या रतिनयनी २

सज्जन मन वृंदावनि किती तुला भजावे

चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे

 

तव चंचल मृदूचरणी २ सांकुर कुसुमित धरणी २

बघुनि मुदित स्थिरचर का मी उगि रहावे

चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे

 

मम जीवन घुंगुर सर २ बांधिन तव पदि सत्वर २

क्षणभरि तरि तव भ्रमणी त्यानि नादवावे

चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे

 

आणि दिव्य किरण तुझे २ अंतरी शिरावे

चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे

 

रचना: बा. भ. बोरकर

गायन : पु ल देशपांडे