महाद्वार रोड व्यापारी व रहिवाश्यांचा अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला विरोध

कोल्हापूर प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाला अंबाबाई मंदिर विकास आराखडा सादर केलेला आहे यामध्ये परिसरातील व्यापारी व रहिवासी यांना विश्वासात न घेता तो सादर केलेला आहे .प्रत्यक्षात विकास आराखड्यावर कोणतीही नागरिकांची किंवा बाधित लोकांची चर्चा न करता आराखडा सादर केल्यामुळे नागरिकांचा तीव्र संताप परिसरात व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने दोन बैठका झाल्या त्यावेळी कोणत्याही व्यक्तीवर […]

महाद्वार रोड व्यापारी व रहिवाश्यांचा अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला विरोध

कोल्हापूर प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाला अंबाबाई मंदिर विकास आराखडा सादर केलेला आहे यामध्ये परिसरातील व्यापारी व रहिवासी यांना विश्वासात न घेता तो सादर केलेला आहे .प्रत्यक्षात विकास आराखड्यावर कोणतीही नागरिकांची किंवा बाधित लोकांची चर्चा न करता आराखडा सादर केल्यामुळे नागरिकांचा तीव्र संताप परिसरात व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने दोन बैठका झाल्या त्यावेळी कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही .त्आहे त्याच ठिकाणी सर्व व्याप्रायांचे पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही दिली होती. प्रशासनाने सर्वांची या विकासाला संमती आहे असे दर्शवून काहींचा विरोध आहे असे शासनापुढे मांडून संभ्रम स्थिती निर्माण केलेली आहे.
सद्यस्थितीत या विकासाकरता कोणत्याही व्यापारी व रहिवासी यांनी कसलीही लेखी किंवा तोंडी संमती दिलेली नसून याबाबत दिशाभूल करणारी पत्रके निघत आहेत. प्रशासनाने विकास आराखडा आम्हाला विश्वासात न घेता सादर केल्यामुळे महाद्वार रोड व्यापारी रहिवासी असोसिएशनचा विकास आराखड्याला तीव्र विरोध आहे. असे प्रसिद्धी पत्रक असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेले आहे. यावेळी अध्यक्ष शामराव जोशी ,उपाध्यक्ष महेश उरसाल , कार्याध्यक्ष भालचंद्र लाटकर, सेक्रेटरी डॉ. गुरुदत्त म्हाडगुत , योगेश पोवार, किरण धर्माधिकारी,अमित माने ,सागर कदम ,शिवनाथ पावसकर, सुधीर जोशी , योगेश कुबेर, दीपक गुळवणी या सर्वांनी हे प्रसिद्धी पत्रक काढलेले आहे.