दक्षिण गोव्यात भाजपला मगो 45 हजार मते देणार : ढवळीकर

पणजी : भारतीय जनता पार्टीने दक्षिण गोव्यात जो उमेदवार दिलेला आहे, त्याचे आम्ही जोरदार स्वागत करतो. यावेळी भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष किमान 45 हजार मते दक्षिण गोव्यातून मिळवून देणार असून यावेळी भाजपचा उमेदवार निश्चित निवडून आणू, असे निवेदन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. ‘तऊण भारत’शी बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, गेल्या निवडणुकीत […]

दक्षिण गोव्यात भाजपला मगो 45 हजार मते देणार : ढवळीकर

पणजी : भारतीय जनता पार्टीने दक्षिण गोव्यात जो उमेदवार दिलेला आहे, त्याचे आम्ही जोरदार स्वागत करतो. यावेळी भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष किमान 45 हजार मते दक्षिण गोव्यातून मिळवून देणार असून यावेळी भाजपचा उमेदवार निश्चित निवडून आणू, असे निवेदन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. ‘तऊण भारत’शी बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम्हाला सरकारमधून बाजूला केले होते, लोकसभा निवडणूक होईपर्यंत जर ठेवले असते तर आम्ही दक्षिण गोव्यातून भाजपचा उमेदवार निश्चित निवडून आणला असता. आता यावेळी मगो पक्ष हा भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत आहे, भाजपबरोबर युती आहे, त्यामुळे भाजपने जो उमेदवार दिलेला आहे, त्याला निवडून आणणे हे आमचे काम आहे.
आपल्या स्वत:च्या मडकई मतदारसंघात 80 टक्के पेक्षा जास्त मते आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळवून देणार आहोत. याशिवाय संपूर्ण फोंडा तालुक्यात मगोची जी असंख्य मते आहेत ती देखील आपण मिळवून देणार आहे. दक्षिण गोव्यातून किमान 45 हजार मते मगोपक्षातर्फे भाजप उमेदवाराला मिळवून देणार आहोत. उमेदवार कसा असावा, कोणता असावा याबाबत आमच्या कोणत्याही अटी नाहीत. भारतीय जनता पक्ष जो कोणी उमेदवार देईल, त्याला निवडून देण्याचे आमचे कर्तव्य असून ते कर्तव्य आम्ही पार पाडणार आहोत. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराबाबत ज्या काही विरोधी पक्षांकडून टीका होत आहे किंवा सत्ताधारी भाजपमधीलच काही पदाधिकारी टीका करीत आहेत, त्यांच्याशी आमचे काहीही देणेघेणे नाही. आमचे उद्दिष्ट आहे भाजपचा उमेदवार दक्षिण गोव्यात निवडून देणे आणि भाजपने आमच्यावर जी काही जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही अवश्य पार पाडू. दक्षिण गोव्यातून भाजपच्या उमेदवाराला विजयी करू, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.