मध्य प्रदेश: क्रिकेट खेळत असतांना तरुण जागेवरच कोसळला

मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळता-खेळता एका 22 वर्षीय तरुणाच्या अचानक मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. क्रिकेट खेळताना तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, क्रिकेट खेळता-खेळता एका 22 वर्षीय तरुणाच्या अचानक छातीत दुखू लागले, बॉलिंग करत असताना तो जमिनीवर कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  इंदलसिंग जाधव (वय 22) असं मृत तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खरगोन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे80 किलोमीटर अंतरावर असलेल्या बरवाह पोलिस स्टेशन हद्दीतील कटकूट गावात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

इंदलसिंग हा 22 वर्षीय तरुण बरखड तांडा गाव संघाकडून खेळत होता. प्रथम फलंदाजी करताना इंदलसिंग याने 70 धावा कुटल्या. जेव्हा त्याची गोलंदाजी करण्याची वेळ आली, तेव्हा इंदलसिंगने शानदार गोलंदाजी केली, पण गोलंदाजी करताना त्याच्या छातीत दुखू लागले.

इतर मित्रांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. मात्र, ओव्हर पूर्ण करून बाहेर जातो, असं इंदलसिंगने सांगितलं. दरम्यान, गोलंदाजी करता-करता तो जमिनीवर कोसळला. मैदानावर उपस्थित असलेल्या इतर तरुणांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. इंदलसिंग याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तरुण खेळाडूचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  

Edited By- Ratnadeep Ranshoor

Go to Source