LPG सिलिंडर झाले स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

आज पासून जुलै महिना सुरु झाला असून जुलै महिन्याचा पहिल्याच दिवशी केंद्र सरकार कडून सर्व सामान्य नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. एलपीजी सिलींडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्या पहाटे 6 वाजता गॅस सिलिंडरचे नवे दर जारी केले असून आता …

LPG सिलिंडर झाले स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

आज पासून जुलै महिना सुरु झाला असून जुलै महिन्याचा पहिल्याच दिवशी केंद्र सरकार कडून सर्व सामान्य नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. एलपीजी सिलींडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 

तेल विपणन कंपन्या पहाटे 6 वाजता गॅस सिलिंडरचे नवे दर जारी केले असून आता आजपासून एलपीजी गॅस सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. 

गॅस सिलिंडरच्या कमी झालेल्या किमती व्यवसायीक सिलिंडरसाठी आहे. मुंबईत आता 19 किलोचा कमर्शिअल किंवा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1598 रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीत सिलिंडरची किंमत 1646 रुपये झाली आहे. कोलकाता मध्ये व्यावसायिक साळींदर 1756 आहे तर चैन्नईत सिलिंडरच्या किमतीत 31 रुपयांची कपात होऊन सिलिंडर 1809.50 रुपयांना मिळणार आहे. 

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर 802 .50 रुपयांनी मिळत आहे. केंद्र सरकार कडून गेल्या 10 महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 300 रुपयांनी कपात केली असून आता घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. तर येत्या काही महिन्यांत कमर्शिअल सिलिंडर मध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

 

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source