चीनमध्ये भाड्याने मिळतात प्रियकर
डेटिंग रिहर्सलसाठी होतो वापर
जर तुम्हाला अत्यंत वेगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर आशिया हे र्पा जगात सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील देशांमध्ये एकाहून एक विचित्र गोष्टी घडत असतात. तुम्ही भाड्याने घर, फर्निचर किंवा पुस्तके मिळत असल्याचे पाहिले असेल. परंतु जपानमध्ये एक अजब सेवा उपलब्ध होत आहे. ही सेवा डेटिंगच्या रिहर्सलसाठी आहे.
जपानचा एक इसम ‘रेंटल बुसैकु’ नावाची सर्व्हिस ऑफर करतो. याचा अर्थ ‘मी सुंदर नाही, परंतु भाडेतत्वावर उपलब्ध आहे’ असा होतो. या सेवेच्या अंतर्गत हा इसम आपण ब्लाइंड डेट्सवर येऊ शकतो किंवा कुठलीही महिला मला स्वत:च्या डेटच्या रिहर्सलसाठी बोलावू शकतो असे सांगतो. खरी डेट संबंधित महिला कुठल्याही सुंदर पुरुषासोबत करू शकते, परंतु रिहर्सल माझ्यासोबत करावी असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या या सेवेला जपानमध्ये मोठी मागणी देखील आहे. परंतु कोरोना काळात त्याच्या या सेवेला फटका बसला होता. पण लोकांची मागणी आणि वर्कप्रेशरमुळे त्याला आता पुन्हा सेवा सुरू करावी लागली आहे. तो 2-3 तासांच्या डेटिंग रिहर्सलसाठी 5 हजार रुपये आकारतो तसेच भोजनाचे पैसे देखील संबंधित ग्राहकालाच द्यावे लागतात.
मजेशीर पर्याय
याचबरोबर आणखी काही अनोख्या सर्व्हिसेस आहेत. एका टिकटॉकरने आपण पैसे देऊन लोकांना ‘स्लीप कॉल’ची सेवा देत असल्याचे सांगितले आहे. याच्या अंतर्गत एकटे वाटणारे लोक झोपी जात नाही तोवर हा इसम फोन कॉलद्वारे बोलत राहतो. याकरता हा टिकटॉकर तासांच्या हिशेबाने पैसे आकारतो. ऑनलाइन गेम खेळण्यासाठी देखील लोक भाडेतत्वावर उपलब्ध आहेत. तर चीनमध्ये एक व्यक्ती केवळ आणि केवळ अजब नृत्य करण्यासाठी पैसे आकारत असतो.
Home महत्वाची बातमी चीनमध्ये भाड्याने मिळतात प्रियकर
चीनमध्ये भाड्याने मिळतात प्रियकर
डेटिंग रिहर्सलसाठी होतो वापर जर तुम्हाला अत्यंत वेगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर आशिया हे र्पा जगात सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील देशांमध्ये एकाहून एक विचित्र गोष्टी घडत असतात. तुम्ही भाड्याने घर, फर्निचर किंवा पुस्तके मिळत असल्याचे पाहिले असेल. परंतु जपानमध्ये एक अजब सेवा उपलब्ध होत आहे. ही सेवा डेटिंगच्या रिहर्सलसाठी आहे. जपानचा एक इसम ‘रेंटल बुसैकु’ […]