हलगा-मच्छे बायपास विरोधात आज लोटांगण आंदोलन
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याविरोधात शेतकरी लोटांगण आंदोलन करणार आहेत. शनिवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता कित्तूर चन्नम्मा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी लोटांगण घालत जाणार आहेत. बेकायदेशीररित्या रस्ता करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला असून बहुसंख्य शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. हलगा-मच्छे बायपासच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. सुपीक जमिनीतून हा रस्ता करण्यात येत आहे. उच्च न्यायालयात या रस्त्याचा खटला प्रलंबित आहे. असे असताना दडपशाही करत रस्ता केला जात आहे. एक प्रकारे लोकशाही पायदळी तुडविण्याचा हा प्रकार आहे. शेतकरी मात्र लोकशाहीमार्गाने हे आंदोलन करणार आहेत. याबाबत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी हलगा-मच्छे बायपास विरोधात आज लोटांगण आंदोलन
हलगा-मच्छे बायपास विरोधात आज लोटांगण आंदोलन
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याविरोधात शेतकरी लोटांगण आंदोलन करणार आहेत. शनिवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता कित्तूर चन्नम्मा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी लोटांगण घालत जाणार आहेत. बेकायदेशीररित्या रस्ता करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला असून बहुसंख्य शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. हलगा-मच्छे बायपासच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय केला […]
