लोणावळ्याच्या भुशी डॅममधून वाहून गेल्याने 5 पर्यटकांचा मृत्यू

लोणावळा हिल स्टेशनजवळील धबधब्यात एक महिला आणि चार मुलांसह पाच जण वाहून गेले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. लोणावळा पोलिस ठाण्याचे प्रभारी मयूर आगनावे यांनी सांगितले की, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. भुशी डॅमजवळील डोंगराळ जंगलात वाहणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हे कुटुंब आले होते.  सततच्या पावसामुळे बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात मोठा अडथळे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  वास्तविक रविवार असल्याने भुशी धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे भुशी धरण परिसरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत पीडित महिलेचे वय सुमारे 40 वर्षे असून मुलांचे वय 4 ते 8 वर्षांच्या दरम्यान आहे. हे सर्वजण पुण्यातील सय्यद नगर येथील रहिवासी होते. धबधब्याच्या तळाशी असलेल्या शेवाळलेल्या दगडांवर ते घसरले असावेत आणि पाण्यात वाहून गेले, असे स्थानिक लोकांनी सांगितले. आग्नेव म्हणाले की, स्थानिक लोक आणि पोलिसांचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. शाइस्ता अन्सारी (36), अमिना अन्सारी (13) आणि उमरा अन्सारी (8) यांचे मृतदेह सापडले आहेत, तर अदनान अन्सारी (4) आणि मारिया सय्यद (9) बेपत्ता आहेत, असे त्यांनी सांगितले. लोणावळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक येथे पर्यटनासाठी येत असतात. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोणावळा ग्रामीण पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहिल्याच पावसात भुशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.हेही वाचा आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कारखान्यातील कामगाराचेचदरड कोसळण्यापासून रोखण्यासाठी भूस्खलन भागात संरक्षण जाळीचा वापर

लोणावळ्याच्या भुशी डॅममधून वाहून गेल्याने 5 पर्यटकांचा मृत्यू

लोणावळा हिल स्टेशनजवळील धबधब्यात एक महिला आणि चार मुलांसह पाच जण वाहून गेले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. लोणावळा पोलिस ठाण्याचे प्रभारी मयूर आगनावे यांनी सांगितले की, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. भुशी डॅमजवळील डोंगराळ जंगलात वाहणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हे कुटुंब आले होते. सततच्या पावसामुळे बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात मोठा अडथळे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वास्तविक रविवार असल्याने भुशी धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे भुशी धरण परिसरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत पीडित महिलेचे वय सुमारे 40 वर्षे असून मुलांचे वय 4 ते 8 वर्षांच्या दरम्यान आहे. हे सर्वजण पुण्यातील सय्यद नगर येथील रहिवासी होते. धबधब्याच्या तळाशी असलेल्या शेवाळलेल्या दगडांवर ते घसरले असावेत आणि पाण्यात वाहून गेले, असे स्थानिक लोकांनी सांगितले. आग्नेव म्हणाले की, स्थानिक लोक आणि पोलिसांचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. शाइस्ता अन्सारी (36), अमिना अन्सारी (13) आणि उमरा अन्सारी (8) यांचे मृतदेह सापडले आहेत, तर अदनान अन्सारी (4) आणि मारिया सय्यद (9) बेपत्ता आहेत, असे त्यांनी सांगितले.लोणावळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक येथे पर्यटनासाठी येत असतात. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोणावळा ग्रामीण पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहिल्याच पावसात भुशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.हेही वाचाआईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कारखान्यातील कामगाराचेच
दरड कोसळण्यापासून रोखण्यासाठी भूस्खलन भागात संरक्षण जाळीचा वापर

Go to Source