लोकमान्य किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर
उद्या कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरमध्ये बक्षीस वितरण
बेळगाव : लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा ‘गडांचा राजा’ म्हणून शहापूर हट्टीहोळी गल्ली यांनी (तोरणा गड) मानाचा किताब मिळविला. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बुधवार दि. 20 रोजी सायंकाळी 5.30 वाजता, कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेला शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये 100 हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. याबरोबरच इतर निकाल पुढीलप्रमाणे…
शहापूर विभाग
भारतनगर-शहापूर, प्रतिक राऊळ (प्रचंडगड-तोरणा)
पवार गल्ली-शहापूर, वारणा ग्रुप (नागरधन गड)
अंबाई मंदिर, खडेबाजार- शहापूर, प्रणव, अनिरुद्ध, पृथ्वीराज, प्रथमेश (जंजिरा गड),
उत्तेजनार्थ जेड गल्ली, शहापूर, श्री गवळी (कोरी गड).
शहापूर विभाग (लहान ग्रुप)
आदर्शनगर-हिंदवाडी, वसंत नामदेव पाटील (पन्हाळगड)
बिच्चू गल्ली-शहापूर, धर्मवीर संभाजी युवा मंडळ (पारगड)
तांबीट गल्ली, होसूर-शहापूर, एमजीएस (पन्हाळगड),
उत्तेजनार्थ
आठवा, क्रॉस, हिंदवाडी, ओम महादेव महाले, (प्रतापगड)
आदर्शनगर- हिंदवाडी, लाभश्री वेर्णेकर (शिवाजी महाराज प्रतिकृती).
अनगोळ विभाग-लहान गट
बडमंजीनगर, रितेश बडमंजी (प्रतापगड)
लोहार गल्ली, श्री गणेशोत्सव मंडळ (प्रतापगड)
रघुनाथपेठ-अनगोळ, स्वयम विनोद चोपडे (प्रतापगड)
विघ्नहर्ता गल्ली, विघ्नहर्ता स्पोर्ट्स, (सिंहगड)
तिसरा क्रॉस-भाग्यनगर, वंश योगेश कामू (पन्हाळगड).
अनगोळ विभाग-मोठा गट
रघुनाथपेठ-अनगोळ, शिवनेरी युवक मंडळ,
तानाजी गल्ली- मजगाव, तानाजी युवक मंडळ (सिंहगड)
स्वयम युवक मंडळ,नाथ पै नगर, मेघशाम जाधव (राजगड)
लोहार गल्ली- अनगोळ, विशाल लोहार (राजगड).
टिळकवाडी विभाग-मोठा गट
पहिला क्रॉस-गजानननगर, मस्त मराठी बॉईज, (देवगिरीगड)
आर. सी. नगर-पहिला क्रॉस, आदित्य नारायण कुट्रे (पद्मदुर्ग गड)
भवानीनगर-मंडोळी रोड, शिवराय मंडळ (कोरीगड).
टिळकवाडी विभाग-लहान गट
महर्षी रोड, शांतीनगर, मावळसेना (प्रतापगड)
एम. जी. रोड-हिंदुनगर, नैशा तुडयेकर, तनय गुंजटकर-पाटील, (प्रतापगड)
भवानीनगर, शैलेश सिद्धार्थ भातकांडे (राजहंसगड)
चौगुलेवाडी, वेदांत नागेश फाटक (पन्हाळागड)
भवानीनगर, श्रीजीत अरुण पाटील (भवानीगड).
वडगाव विभाग-मोठा गट
लक्ष्मी गल्ली-जुने बेळगाव, मनीष सालगुंडे (नालदुर्ग गड)
फुले गल्ली-वडगाव, रोहन विजय मंडोळकर (वेतळे गड)
दुसरा क्रॉस, समृद्धी कॉलनी, हारेश खानूरकर (तोरणा गड)
नाझर कॅम्प-तिसरा क्रॉस, मनश्री माईटे
तिसरा क्रॉस-आनंदनगर, सौरभ पाटील (पावनखिंड).
वडगाव विभाग-लहान गट
सिद्धिविनायक मार्ग, आयुष पाटील (राजहंसगड)
रयत गल्ली-जुने बेळगाव, हरी प्रताप सालगुंडी (सुवर्णदुर्ग गड)
पाटील गल्ली-वडगाव, जितीन जाधव (भारत गड)
विष्णू गल्ली-वडगाव, अनुष्क लाड (सिंधगड)
पाटील गल्ली-वडगाव, नक्षा भोसले (हुंदरी गड).
बेळगाव विभाग-1 मोठा गट
फुलबाग गल्ली, प्रगती युवक मंडळ, (खंदेरी उंदेरी)
ताशिलदार गल्ली, टी. जी. बॉईज (देवगिरी गड)
समर्थनगर, बाल शिवराय मित्र मंडळ (जंजिरा).
बेळगाव विभाग-लहान गट
तिसरा क्रॉस, समर्थनगर, श्री संयुक्त समर्थ युवक मंडळ (खंदेरी गड)
नार्वेकर गल्ली, विहान असुरकर, रुही केसरकर (पन्हाळगड)
कंग्राळ गल्ली, प्रज्योत कांगले, प्रितम, शुभम (पारगड)
पांगुळ गल्ली श्रेयस अनगोळकर (राजहंसगड).
बेळगाव विभाग-2 मोठा गट
विनायक कॉलनी-शाहूनगर, शाहू युवक मंडळ (दुर्ग उंदेरीगड)
शिवबसव मार्ग, शाहूनगर श्री छत्रपती युवक मंडळ (भुवनगिरी गड)
कंग्राळकर कॉलनी- आंबेडकरनगर, यश रमेश कंग्राळकर (राजगड).
बेळगाव विभाग-लहान गट
पहिला क्रॉस-नेहरूनगर, श्री भगवा चौक युवक मंडळ (सिंहगड).
कंग्राळ गल्ली, स्वराज, वेदांत (कलानिधी गड)
डी-मार्ट रोड, तिसरा क्रॉस, नेहरूनगर, वादळ ग्रुप (जंजिरा).
विशेष बक्षिसांचे मानकरी
हेरवाडकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सदर किल्ला स्पर्धेत आपल्या शाळेमार्फत सहभाग घेऊन मातीचे किल्ले बांधण्याची कला जोपासली व शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार बनले. त्यांच्या या कौशल्याला वाव देण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी विशेष बक्षिसे जाहीर केली आहेत. सदर विजेत्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. विजेत्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून बक्षिसे स्वीकारावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
1) आयुष जोशिलकर (प्रतापगड) 2) अथर्व पाटील (संतोषगड)
3) प्रशिल गावडे (राजहंसगड)
4) रणवीर शिंदे (भारतगड).
पुढील वर्षीपासून आंतरशालेय किल्ला स्पर्धा
पुढील वर्षीपासून शहरातील आंतरशालेय स्तरावर शिवकालीन किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यात प्राथमिक, माध्यमिक शालेय संघांनी आपल्या कला सादर करण्यासाठी शिक्षकांमार्फत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.