‘एलआयसे’ने प्राप्त केला नवा विक्रम

बाजारमूल्य 7.34 लाख कोटींवर : कंपनीच्या समभागांची चमकदार कामगिरी वृत्तसंस्था/ मुंबई सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) च्या समभागाने 26 जुलै रोजी बीएसईवर 1178.60 चा नवीन उच्चांक गाठला आहे. या अगोदर 9 फेब्रुवारी 2024 रोजी, समभागांनी प्रति शेअर 1175 च्या एतिहासिक उच्चांक प्राप्त केला होता. सदरची उत्कृष्ट कामगिरी पाहता, स्टॉकने आतापर्यंत 38.61 […]

‘एलआयसे’ने प्राप्त केला नवा विक्रम

बाजारमूल्य 7.34 लाख कोटींवर : कंपनीच्या समभागांची चमकदार कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) च्या समभागाने 26 जुलै रोजी बीएसईवर 1178.60 चा नवीन उच्चांक गाठला आहे. या अगोदर 9 फेब्रुवारी 2024 रोजी, समभागांनी प्रति शेअर 1175 च्या एतिहासिक उच्चांक प्राप्त केला होता.
सदरची उत्कृष्ट कामगिरी पाहता, स्टॉकने आतापर्यंत 38.61 टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. हा आकडा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी पेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे, ज्यांनी अनुक्रमे 11.24 टक्के आणि 12.86 टक्के परतावा दिला आहे.
बाजारमूल्यात वाढ
आजच्या व्यापारात नवीन सर्वकालीन उच्चांक गाठताना, एलआयसीचे बाजार भांडवल 7.34 लाख कोटींवर पोहोचले. यासह एलआयसी ही भारतातील आठवी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी बनली आहे आणि सरकारी-सूचीबद्ध पीएसयू कंपन्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियानंतर दुसरी मोठी कंपनी म्हणून गणली गेली आहे. शेअरचा सध्याचा भाव 1,171.40 प्रति शेअर पाहता, तो त्याच्या आयपीओ किमतीपेक्षा 21.71 टक्केवर व्यापार करत आहे.
दुसरीकडे, वर्षभरात, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सारख्या खासगी जीवन विमा कंपन्या 6.31 टक्के वाढल्या आहेत, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 32.93 टक्के आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 18.66 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
आयडीएफसीत हिस्सा वाढवला
याच दरम्यान एलआयसीने आयडीएफसी फर्स्ट बँकेतील आपला हिस्सा वाढवल्याची माहिती आहे. एलआयसीने खाजगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेतील आपला हिस्सा 0.20 टक्क्यांनी वाढवून 2.68 टक्के केला आहे. एक्स्चेंज फाइलिंगनुसार, भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने आयडीएफसी फर्स्ट बँक एलटीडीमधील आपला हिस्सा 4 जुलै रोजी 0.20 टक्क्यांपर्यंत वाढवला. विमा कंपनीने खाजगी प्लेसमेंट ऑफर (पीपीओ) द्वारे 80.63 रुपये प्रति किमतीने बँकेतील आपला हिस्सा वाढवला आहे.