अबकारी खात्याकडून 89 लाखांचा मद्यसाठा नष्ट
जप्त दारूसाठ्यावर फिरवला जेसीबी
बेळगाव : बेकायदेशीर मद्य विक्रीवर व गोवा येथून बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अबकारी खात्याने कारवाई करून मोठा साठा जप्त केला होता. तो साठा मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आला आहे. एकूण 89 लाख 60 हजाराचा दारूसाठा असल्याचे अबकारी खात्याने सांगितले. कणबर्गीजवळील रामतीर्थनगर येथील मैदानामध्ये हा साठा नष्ट करण्यात आला. गोवा बनावटीची याचबरोबर गावठी दारूदेखील जप्त करण्यात आली होती. तसेच बनावट दारूचाही यामध्ये समावेश होता. अबकारी खात्याकडे 101 प्रकरणांची नोंद झाली होती. त्यामधील साठा नष्ट करण्यात आला आहे. अबकारी खात्याने दिलेल्या माहितीनुसार 18 हजार 297 लिटर विविध कंपन्यांचे मद्य, 4 हजार 61 लिटर बिअर, 665 लिटर हातभट्टी दारू अशाप्रकारे 89 लाख 65 हजार रुपयांचा हा दारूसाठा होता. इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेला दारूसाठा नष्ट करण्यासाठी अबकारी खात्याला जेसीबी मागवावा लागला. यामुळे हा विषय शासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा ठरला होता. अबकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा साठा नष्ट करण्यात आला. यावेळी अबकारी उपायुक्त वनजाक्षी एम., डीवायएसपी रवी मुरगोड, पोलीस निरीक्षक चिदानंद, मंजुनाथ मळगेरी, महेश परीट, बसवराज मुडशी, श्रीशैल अक्की, बसवराज कित्तूर यांच्यासह अबकारी खात्याचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी अबकारी खात्याकडून 89 लाखांचा मद्यसाठा नष्ट
अबकारी खात्याकडून 89 लाखांचा मद्यसाठा नष्ट
जप्त दारूसाठ्यावर फिरवला जेसीबी बेळगाव : बेकायदेशीर मद्य विक्रीवर व गोवा येथून बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अबकारी खात्याने कारवाई करून मोठा साठा जप्त केला होता. तो साठा मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आला आहे. एकूण 89 लाख 60 हजाराचा दारूसाठा असल्याचे अबकारी खात्याने सांगितले. कणबर्गीजवळील रामतीर्थनगर येथील मैदानामध्ये हा साठा नष्ट करण्यात आला. गोवा […]