दारूविक्री बंदीचा असाही फटका

दुकान व्यवस्थापकाच्या घरी 4 लाखांची चोरी बेळगाव : एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 4 लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. उक्कड (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. उक्कड येथील चंद्रशेखर मुदकाप्पा बंडीव•र यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर हे उक्कड येथील एका बारमध्ये […]

दारूविक्री बंदीचा असाही फटका

दुकान व्यवस्थापकाच्या घरी 4 लाखांची चोरी
बेळगाव : एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 4 लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. उक्कड (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. उक्कड येथील चंद्रशेखर मुदकाप्पा बंडीव•र यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर हे उक्कड येथील एका बारमध्ये व्यवस्थापक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचा आदेश असल्यामुळे दि. 5 मे रोजी बारला कुलूप लावून ते त्याच दिवशी रात्री हिडकल डॅमला गेले होते. मंगळवार दि. 7 मे रोजी मतदानासाठी ते उक्कडला आले. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घरात प्रवेश करून पाहिले असता कपाटातील 2 लाख 98 हजार रुपये रोख रक्कम व तीन तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 3 लाख 86 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याचे आढळून आले. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बँकांना सुटी असल्यामुळे दोन दिवस बारमध्ये जमलेले पैसे चंद्रशेखर यांनी आपल्या घरी ठेवले होते. चोरट्यांनी ही रक्कम पळविली आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.