टोलचा गोंधळ, फास्टटॅगचा झोल

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या आदल्या दिवशी राज्य सरकारने मुंबईतील (mumbai) पाच टोलनाक्यांवरील हलक्या वाहनांना सरसकट माफी जाहीर केली. मात्र, ‘फास्टॅग’ प्रणाली अपलोड न केल्यामुळे कोणतीही सूचना न देता पैसे कापण्यात आल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. त्यानंतर टोलमुक्त वाहनांसाठी स्वतंत्र लेन ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हलक्या वाहनांसाठी (light vehicle) टोल न आकारण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी सरकारने मुलुंड, ऐरोळी, दहिसर, वाशी (vashi), लाल बहादूर शास्त्री मार्गासह पाच टोलनाक्यांवरून (toll naka)छोटी वाहने, एसटी आणि शाळकरी बसेसना सूट देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मंगळवारी सकाळी फास्टॅगवरून (fastag) टोलचे पैसे कापले गेल्याचे वाहनचालकांना मेसेजद्वारे समजले. अनेकांनी टोल बुथ कर्मचाऱ्यांकडे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. मुलुंड टोलनाक्यावर छोट्या वाहनांसाठी आणखीन लेन देण्याची मागणी करण्यात आली. कंत्राटदाराकडून निश्चित टोल असलेल्या अवजड वाहनांना प्राधान्य दिले जात असल्याची तक्रारही काही वाहनचालकांनी केली. यासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हलक्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचे आदेश संबंधित टोल कंपनीला देण्यात आले आहेत. ‘फास्टॅग’वरून होणारी वसुली थांबवण्याबाबत संबंधित बँकांनाही कळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पाचही टोल नाक्यांवर कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी हलक्या वाहनांना टोल माफ करण्याच्या श्रेयासाठी सत्ताधारी महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मुलुंड टोल बुथवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे होर्डिंग लावण्यात आले होते. त्या फलकाच्या बाजूला मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारा फलक लावला.हेही वाचा शंभर, दोनशेचा स्टॅम्प इतिहासजमा, सर्व व्यवहारासाठी पाचशेचाच स्टॅम्प ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी सरकारकडून टोलला परवानगी

टोलचा गोंधळ, फास्टटॅगचा झोल

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या आदल्या दिवशी राज्य सरकारने मुंबईतील (mumbai) पाच टोलनाक्यांवरील हलक्या वाहनांना सरसकट माफी जाहीर केली. मात्र, ‘फास्टॅग’ प्रणाली अपलोड न केल्यामुळे कोणतीही सूचना न देता पैसे कापण्यात आल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. त्यानंतर टोलमुक्त वाहनांसाठी स्वतंत्र लेन ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हलक्या वाहनांसाठी (light vehicle) टोल न आकारण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी सरकारने मुलुंड, ऐरोळी, दहिसर, वाशी (vashi), लाल बहादूर शास्त्री मार्गासह पाच टोलनाक्यांवरून (toll naka)छोटी वाहने, एसटी आणि शाळकरी बसेसना सूट देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मंगळवारी सकाळी फास्टॅगवरून (fastag) टोलचे पैसे कापले गेल्याचे वाहनचालकांना मेसेजद्वारे समजले. अनेकांनी टोल बुथ कर्मचाऱ्यांकडे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. मुलुंड टोलनाक्यावर छोट्या वाहनांसाठी आणखीन लेन देण्याची मागणी करण्यात आली. कंत्राटदाराकडून निश्चित टोल असलेल्या अवजड वाहनांना प्राधान्य दिले जात असल्याची तक्रारही काही वाहनचालकांनी केली. यासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हलक्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचे आदेश संबंधित टोल कंपनीला देण्यात आले आहेत. ‘फास्टॅग’वरून होणारी वसुली थांबवण्याबाबत संबंधित बँकांनाही कळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पाचही टोल नाक्यांवर कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.दुसऱ्या दिवशी हलक्या वाहनांना टोल माफ करण्याच्या श्रेयासाठी सत्ताधारी महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मुलुंड टोल बुथवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे होर्डिंग लावण्यात आले होते. त्या फलकाच्या बाजूला मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारा फलक लावला.हेही वाचाशंभर, दोनशेचा स्टॅम्प इतिहासजमा, सर्व व्यवहारासाठी पाचशेचाच स्टॅम्पठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी सरकारकडून टोलला परवानगी

Go to Source