व्हीटीयूमध्ये लिफ्टअप बेळगाव स्मार्टअप
डिझाईन थिंकिंग कार्यशाळेचे उद्घाटन
बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) येथील रिसर्च आणि युनोव्हेशन फौंडेशन तसेच ट्राय बेंगळूर, शिल्को फौंडेशन आणि वादवानी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर कर्नाटकातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय डिझाईन थिंकिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लिफ्टअप बेळगाव स्मार्टअप या घोषवाक्याखाली स्टुडन्ट स्टार्टअप चॅलेंज कार्यक्रमाला विद्यापीठाचे उपकुलगुरु प्रा. विद्याशंकर एस. यांनी चालना दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन करून बोलताना उपकुलगुरु विद्याशंकर म्हणाले, राज्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर कौशल्यपूर्ण नागरिक बनविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशाच्या विकासासाठी ही अत्यंत उपयोगी ठरणारी गोष्ट आहे. यासाठीच व्हीटीयूकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी असे उपक्रम राबविले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. केवळ प्रशिक्षण देणे व्हीटीयूचा उद्देश नसून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. नवनवीन संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच भविष्यातील तंत्रज्ञानाची माहितीही करून दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर फौंडेशन प्रोग्रॅम मॅनेजर लक्ष्मी उन्नी, निबंधक प्रा. डी. ई. रंगस्वामी, प्रा. टी. एन. श्रीनिवास, एम. ए. सपना, मदन फडकी, वादवानी फौंडेशनचे संघमित्रा भासीन, व्यंकटेश पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये कोप्पळ, गदग, विजापूर, बागलकोट, बेळगाव जिल्ह्यातील 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
Home महत्वाची बातमी व्हीटीयूमध्ये लिफ्टअप बेळगाव स्मार्टअप
व्हीटीयूमध्ये लिफ्टअप बेळगाव स्मार्टअप
डिझाईन थिंकिंग कार्यशाळेचे उद्घाटन बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) येथील रिसर्च आणि युनोव्हेशन फौंडेशन तसेच ट्राय बेंगळूर, शिल्को फौंडेशन आणि वादवानी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर कर्नाटकातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय डिझाईन थिंकिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लिफ्टअप बेळगाव स्मार्टअप या घोषवाक्याखाली स्टुडन्ट स्टार्टअप चॅलेंज कार्यक्रमाला विद्यापीठाचे उपकुलगुरु प्रा. विद्याशंकर एस. यांनी चालना दिली. […]