फ्लाय 91 या कंपनीला विमान सेवेला परवाना

मुंबई : हवाई क्षेत्रातले दिग्गज मनोज चाको यांचे पाठबळ लाभलेल्या फ्लाय 91 या कंपनीला विमान सेवा चालवण्यासंदर्भातला परवाना डीजीसीए यांच्याकडून मिळाला असल्याची माहिती आहे. नवी प्रादेशिक पातळीवरची ही विमान सेवा कंपनी असून लक्षदीप या ठिकाणाहून इतर शहरांना कंपनी आपली विमानसेवा लवकरच सुरु करणार आहे, असे कळते. यासंदर्भातली विमान फेऱ्यांची सेवा ही याच आठवड्यात सुरु केली […]

फ्लाय 91 या कंपनीला विमान सेवेला परवाना

मुंबई :
हवाई क्षेत्रातले दिग्गज मनोज चाको यांचे पाठबळ लाभलेल्या फ्लाय 91 या कंपनीला विमान सेवा चालवण्यासंदर्भातला परवाना डीजीसीए यांच्याकडून मिळाला असल्याची माहिती आहे. नवी प्रादेशिक पातळीवरची ही विमान सेवा कंपनी असून लक्षदीप या ठिकाणाहून इतर शहरांना कंपनी आपली विमानसेवा लवकरच सुरु करणार आहे, असे कळते. यासंदर्भातली विमान फेऱ्यांची सेवा ही याच आठवड्यात सुरु केली जाईल, असे सांगितले जात आहे. कंपनीकडे सध्याला दोन एटीआर 72 ही विमाने ताफ्यात असून सप्टेंबरपर्यंत आणखी चार विमानांची भर पडणार असल्याची माहिती आहे.