गुलामीच्या मानसिकतेपासून मिळतेय मुक्ती

वाराणसीत ‘स्वर्वेद महामंदिरा’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन वृत्तसंस्था/ वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी वाराणसीमध्ये जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र ‘स्वर्वेद महामंदिर’चे उद्घाटन केले आहे. वारसा आणि विकासाच्या मार्गावर आज भारत वेगाने वाटचाल करत आहे. काशीमध्ये स्वर्वेद मंदिराच्या लोकार्पणात सामील होणे माझ्यासाठी सौभाग्याची बाब असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत. सरकार, समाज आणि संतसमुदाय सर्व मिळून काशीच्या कायाकल्पासाठी […]

गुलामीच्या मानसिकतेपासून मिळतेय मुक्ती

वाराणसीत ‘स्वर्वेद महामंदिरा’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
वृत्तसंस्था/ वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी वाराणसीमध्ये जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र ‘स्वर्वेद महामंदिर’चे उद्घाटन केले आहे. वारसा आणि विकासाच्या मार्गावर आज भारत वेगाने वाटचाल करत आहे. काशीमध्ये स्वर्वेद मंदिराच्या लोकार्पणात सामील होणे माझ्यासाठी सौभाग्याची बाब असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
सरकार, समाज आणि संतसमुदाय सर्व मिळून काशीच्या कायाकल्पासाठी कार्य करत आहेत. स्वर्वेद मंदिर निर्माण होणे याच ईश्वरीचे प्रेरणेचे उदाहरण आहे. या मंदिराची दिव्यता जितकी आकर्षित करते, तितकीच याची भव्यता अचंबित करत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
स्वर्वेद मंदिर भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे एक आधुनिक प्रतीक आहे. याच्या भिंतींवर स्वर्वेद अत्यंत सुंदरपणे कोरण्यात आले आहे, वेद, उपनिषद, रामायण, गीता आणि महाभारत इत्यादी ग्रंथांचे दिव्य संदेश देखील यावर कोरण्यात आले आहेत. याचमुळे हे मंदिर एकप्रकारे अध्यात्म, इतिहास आणि संस्कृतीचे जिवंत उदाहरण असल्याचे मोदी म्हणाले.
गुलामीच्या कालखंडात ज्या क्रूर शासकांनी भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सर्वप्रथम आमच्या प्रतिकांना लक्ष्य केले, स्वातंत्र्यानंतर या सांस्कृतिक प्रतिकांची पुनर्निर्मिती करणे आवश्यक होते. जर आम्ही आमच्या सांस्कृतिक ओळखीला सन्मान दिला असता तर देशात एकजुटता आणि आत्मसन्मानाची भावना बळकट झाली असती. परंतु दुर्दैवाने असे घडले नाही. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्मितीला देखील विरोध झाला आणि ही मानसिकता दशकांपर्यंत देशात वरचढ ठरल्याचे मोदींनी म्हटले आहे.
स्वातंत्र्याच्या 7 दशकांनी आज कालचक्र पुन्हा फिरले असून देश आता लालकिल्ल्यावरून गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्ती आणि स्वत:च्या वारशाबद्दल गर्वाची घोषणा करत आहे. जे काम सोमनाथपासून सुरू झाले होते ते आता एक अभियान ठरले आहे. आज काशीमध्ये विश्वनाथ धामची भव्यता भारताच्या अविनाशी वैभवाची गाथा सांगत आहे. महाकाल लोक आमच्या अमरत्वाचा पुरावा देत आहे. केदारनाथ धाम देखील विकासाची नवी उंची गाठत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये अयोयेत राम मंदिराची निर्मिती देखील पूर्ण होणार असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

Go to Source