जनतेच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवू

खासदार प्रियांका जारकीहोळी यांची ग्वाही बेळगाव : अत्यंत कमी अवधीमध्ये निवडणुकीला सामोरे जावे लागल्याने चिकोडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, नेते, आमदार, माजी आमदार या सर्वांच्या सहकार्यामुळे विजय मिळविणे शक्य झाले आहे, असे नवनिर्वाचित खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. विजयी झाल्यानंतर गोकाक येथील आपल्या निवासस्थानी आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. चिकोडी लोकसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते, नेते व […]

जनतेच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवू

खासदार प्रियांका जारकीहोळी यांची ग्वाही
बेळगाव : अत्यंत कमी अवधीमध्ये निवडणुकीला सामोरे जावे लागल्याने चिकोडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, नेते, आमदार, माजी आमदार या सर्वांच्या सहकार्यामुळे विजय मिळविणे शक्य झाले आहे, असे नवनिर्वाचित खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. विजयी झाल्यानंतर गोकाक येथील आपल्या निवासस्थानी आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. चिकोडी लोकसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते, नेते व आमदारांनी सहकार्य केले आहे. याबरोबरच आपले वडील मंत्री सतीश जारकीहोळी, भाऊ राहुल जारकीहोळी यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेमध्ये मतदारांकडून मिळालेला प्रतिसाद विजयाची नांदी ठरला आहे. जनतेच्या समस्या जाणून घेऊन प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.तर इतक्या लहान वयात खासदार म्हणून संसदेत प्रवेश करणे अत्यंत आनंदाची बाब आहे, असे प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले.