लोकसभेनंतर दलित मुख्यमंत्रिपदासाठी आवाज उठवू!

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : दलित मुख्यमंत्री होणार ही मागणी आजची नाही. ही मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून प्रारंभ झाली आहे. दलित मुख्यमंत्री व्हावा ही मागणी काँग्रेसमध्येच नाही तर भाजप-निजद या पक्षांमध्येही आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही पक्षात दलित सीएम झालेला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर या प्रश्नावर आवाज अठवू, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश […]

लोकसभेनंतर दलित मुख्यमंत्रिपदासाठी आवाज उठवू!

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : दलित मुख्यमंत्री होणार ही मागणी आजची नाही. ही मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून प्रारंभ झाली आहे. दलित मुख्यमंत्री व्हावा ही मागणी काँग्रेसमध्येच नाही तर भाजप-निजद या पक्षांमध्येही आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही पक्षात दलित सीएम झालेला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर या प्रश्नावर आवाज अठवू, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. कुवेंपुनगर येथील गृह कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दलित मुख्यमंत्री करावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाज कल्याण मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांनी असे सांगत असमाधान व्यक्त केले आहे. याबाबत पत्रकारांनी पालकमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून मल्लिकार्जुन खर्गे, 2013 मध्ये डॉ. जी. परमेश्वर यांना सीएम पद द्यावे, अशी मागणी होती. मात्र त्या दोघांनाही मुख्यमंत्री पदाचे भाग्य लाभले नाही. आपणही अनेकवेळा मेळाव्यांमध्ये दलित सीएम व्हावा, अशी मागणी केली आहे. एससीएसटी समाजाकडून काँग्रेस पक्षाला अधिक संख्येने मते दिली जातात.
आमच्याकडे सैनिक जास्त आहेत. सैनिकांना पुढे घेऊन जाणारा कॅप्टन नाही. कॅप्टन तयार करावा लागणार आहे. हायकमांडसमोर प्रभाव दाखविण्यात अपशयी झालो आहोत. लोकसभेनंतर दलित सीएम बाबत आवाज उठवू, लोकसभेच्या अत्याधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव-चिकोडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे पहिल्या यादीत जाहीर होणार असून ती दुसऱ्या यादीमध्ये जाहीर केली जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सर्व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची बैठक घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची बैठक घेऊन सल्ला, सूचना घेऊन उमेदवारांची निवड करण्याची सूचना केली आहे. कोणताही उमेदवार कमकुवत समजणार नाही. जिल्ह्यामध्ये धनगर समाजातील आमदार नाही. त्यांनाही संधी द्यावी, यादृष्टीने जिल्ह्यातून दोन मतदारसंघातून धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची चर्चा सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.