बलिदानाचा सूड घेऊच
कथुआ हल्ल्यानंतर भारताचा कठोर संदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 सैनिक हुतात्मा झाले आहेत. या घटनेप्रकरणी भारताकडून कठोर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. कथुआ येथील हल्ल्यात आमच्या सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड उगविला जाईल आणि भारत या हल्ल्यामागील वाईट शक्तींना पराभूत करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांनी मंगळवारी म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या 5 सैनिकांच्या परिवारांबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. राष्ट्राबद्दलची या सैनिकांची नि:स्वार्थ सेवा नेहमीच आठवणीत ठेवली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
कथुआच्या बदनोटा भागात सोमवारी दहशतवाद्यांनी सैन्याच्या वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. तर अनेक सैनिक जखमी झाले होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही कथुआ हल्ल्यातील 5 जवानांच्या हौतात्म्याप्रकरणी मंगळवारी दु:ख व्यक्त केले. या कठीण प्रसंगी राष्ट्र या सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत ठामपणे उभा आहे. दहशतवादविरोधी मोहीम सुरू आहे. आमचे सैनिक क्षेत्रात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले जवान लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
परिणाम भोगावे लागतील
कथुआमध्ये गस्तीपथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले 5 ही सैनिक उत्तराखंडचे रहिवासी होते. या सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मानवतेचे शत्रू आणि या भ्याड हल्ल्याचे दोषी असलेल्या दहशतवाद्यांना कुठल्याही स्थितीत मोकळे सोडले जाणार नाही. या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या लोकांनाही याचे परिणाम भोगावे लागतील. दु:खाच्या या क्षणी पूर्ण राज्य या हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांसोबत उभे असल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी बलिदानाचा सूड घेऊच
बलिदानाचा सूड घेऊच
कथुआ हल्ल्यानंतर भारताचा कठोर संदेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 सैनिक हुतात्मा झाले आहेत. या घटनेप्रकरणी भारताकडून कठोर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. कथुआ येथील हल्ल्यात आमच्या सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड उगविला जाईल आणि भारत या हल्ल्यामागील वाईट शक्तींना पराभूत करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांनी मंगळवारी म्हटले आहे. दहशतवादी […]