हिंडलगा कारागृहात शिक्षणाचे धडे
62 कैदी बनले साक्षर : प्रमाणपत्रांचेही वितरण
बेळगाव : साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील 62 कैदी उत्तीर्ण झाले आहेत. नुकतेच त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यांना शिक्षण देणाऱ्या दहा कैद्यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. ‘शिक्षणातून बदल’ या कार्यक्रमांतर्गत कारागृहात दुसऱ्या टप्प्यातील साक्षरता कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मंगळवार दि. 20 फेब्रुवारी रोजी कैद्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्रौढ शिक्षण खाते व हिंडलगा मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा. बसवराज कुसगल, समन्वय अधिकारी इरय्या हिरेमठ आदी उपस्थित होते. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. निरक्षर कैद्यांना शोधून त्यांना शिक्षण देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील या कार्यक्रमात 62 कैदी उत्तीर्ण झाले आहेत. रफिक मुन्ना, सुरेश मुत्नाळ, मधुरनाथ सनील, महांतेश होंगल, जाकीर हादिमनी, मंजुळा होंगल यांनी कैद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल त्यांनाही प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. यावेळी बी. एम. पाटील, रिजवान नावगेकर, मुदकनगौडर, दुंडय्या, रमेश कांबळे आदी उपस्थित होते. शशिकांत यादगुडे यांनी आभार मानले.
Home महत्वाची बातमी हिंडलगा कारागृहात शिक्षणाचे धडे
हिंडलगा कारागृहात शिक्षणाचे धडे
62 कैदी बनले साक्षर : प्रमाणपत्रांचेही वितरण बेळगाव : साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील 62 कैदी उत्तीर्ण झाले आहेत. नुकतेच त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यांना शिक्षण देणाऱ्या दहा कैद्यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. ‘शिक्षणातून बदल’ या कार्यक्रमांतर्गत कारागृहात दुसऱ्या टप्प्यातील साक्षरता कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मंगळवार दि. 20 […]