27 डिसेंबरपासून कुष्ठरोग शोध अभियान

सर्वेक्षण करून उपचाराचा सल्ला द्या : जिल्हाधिकारी नितेश पाटील बेळगाव : जिल्ह्यातील खानापूर आणि बेळगाव ग्रामीण तालुक्यात कुष्ठरुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. अशा ठिकाणी तातडीने सर्वेक्षण करून त्यांच्यावर त्वरित उपचार करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या 2023-24 मधील एलसीडीसी कार्यक्रमांतर्गत 27 डिसेंबर 23 ते 11 जानेवारी […]

27 डिसेंबरपासून कुष्ठरोग शोध अभियान

सर्वेक्षण करून उपचाराचा सल्ला द्या : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : जिल्ह्यातील खानापूर आणि बेळगाव ग्रामीण तालुक्यात कुष्ठरुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. अशा ठिकाणी तातडीने सर्वेक्षण करून त्यांच्यावर त्वरित उपचार करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या 2023-24 मधील एलसीडीसी कार्यक्रमांतर्गत 27 डिसेंबर 23 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत कुष्ठरूग्णांचा शोध घेण्याचे अभियान आयोजित करण्याबाबत चर्चा केली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.  कुष्ठरुणांना सल्ला देण्याबरोबरच उपचार करा. या रोगाच्या लक्षणांविषयी जनतेमध्ये जागृती करा, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी नितेश पाटील यांनी भित्तीपत्रकाचे अनावरण केले. तसेच जिल्हा प्रशासनातर्फे अभियानाविषयी संदेशही दिला. 27 डिसेंबरपासून होणाऱ्या अभियानामध्ये आरोग्य खात्याचे कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि स्वयंसेवक सहभागी होतील. ते घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करतील. तसेच कुष्ठरोगाची लक्षणे असणाऱ्यांना उपचाराचा सल्ला देतील. बैठकीत जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणे, जिल्हा शल्यचिकित्सक विठ्ठल शिंदे, अप्पर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. गडेद, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉ. गीता कांबळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. संजय दोडमनी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, विविध खात्यांचे जिल्हा स्तरावरील अधिकारी सहभागी होते.

Go to Source