अनगोळ परिसरात जलवाहिनीला गळती
हजारो लिटर पाणी वाया : पाणीपुरवठ्यावर परिणाम
बेळगाव : शहरात कोठेनाकोठे जलवाहिनींना गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे. अनगोळ-मारुती गल्ली येथे जलवाहिनीला गळती लागून पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. त्यावर अनगोळ 24 तास पाणीपुरवठ्याला गळतीचे ग्रहण लागले आहे. या गळतीमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तातडीने गळती दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. मारुती गल्ली, अनगोळ येथे तयार करण्यात आलेला रस्ता खचल्याने पाणी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पहिल्याच वळिवाच्या पावसात रस्ता खचून जलवाहिनीला गळती लागली आहे. यामुळे शेजारील दोन, तीन गल्लीतील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन उन्हाळ्यात सर्वत्र पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. आठ दिवसांआड पाणीपुरवठा होवू लागला आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ग्लोब थिएटरजवळ जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच अनगोळ मारुती गल्लीमध्ये जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे एल अॅण्ड टी कंपनी पाणी वाचवा असा संदेश देत आहे. तर दुसरीकडे गळती लागलेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकडे कंपनीचेच दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होऊ लागला आहे. मारुती गल्ली, अनगोळ येथे भर गल्लीतच जलवाहिनी गळती लागल्याने वाहतुकीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच गळती लागून हजारो लिटर पाणी वाया गेल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ऐन उन्हाळ्यात जलवाहिनीच्या गळतींमुळे अनगोळवासियांना पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे.
Home महत्वाची बातमी अनगोळ परिसरात जलवाहिनीला गळती
अनगोळ परिसरात जलवाहिनीला गळती
हजारो लिटर पाणी वाया : पाणीपुरवठ्यावर परिणाम बेळगाव : शहरात कोठेनाकोठे जलवाहिनींना गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे. अनगोळ-मारुती गल्ली येथे जलवाहिनीला गळती लागून पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. त्यावर अनगोळ 24 तास पाणीपुरवठ्याला गळतीचे ग्रहण लागले आहे. या गळतीमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तातडीने गळती दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, […]