मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या एका जलवाहिनीला अचानक गळती सुरू झाली आहे. वांद्रे पश्चिम इथल्या 2 जलवाहिन्या पैक्की एका 600 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीत गळती सुरू झाली आहे.  एच-पश्चिम प्रभागातील (खार आणि वांद्रे पश्चिमेचा काही भाग) पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. पाणी गळती सुरू झाल्याची माहिती मिळताच मुंबई मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी गळती रोखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिकेची टीम अथक प्रयत्न करत आहे. जलवाहिनीच्या गळतीमुळे एच पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा प्रभावीत झाला आहे. काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. तथापि, काही भागात वेरावली जलाशय व उर्वरित दुसऱ्या पाली इनलेट द्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी 10 टक्के पाणी कपात बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये 30 नोव्हेंबर 2024 रोजी तांत्रिक बिघाड झाला होता. हे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. 1 डिसेंबर 2024 ते 2 डिसेंबर 2024 रोजी दुरुस्ती काम सुरू होते. मात्र, या कामामुळे पाच दिवस पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर आणि उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे – भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. यामुळे 1 डिसेंबर 2024 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात आली होती. 6 डिसेंबर रोजी पाणी कपात मागे मुंबई, ठाणे आणि भिवंडी शहरात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.हेही वाचा मेट्रो 9 च्या कंत्राटदाराला 40 लाखांचा दंडमुंबईला 250 नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळणार

मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या एका जलवाहिनीला अचानक गळती सुरू झाली आहे. वांद्रे पश्चिम इथल्या 2 जलवाहिन्या पैक्की एका 600 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीत गळती सुरू झाली आहे. एच-पश्चिम प्रभागातील (खार आणि वांद्रे पश्चिमेचा काही भाग) पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.पाणी गळती सुरू झाल्याची माहिती मिळताच मुंबई मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी गळती रोखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिकेची टीम अथक प्रयत्न करत आहे.जलवाहिनीच्या गळतीमुळे एच पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा प्रभावीत झाला आहे. काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. तथापि, काही भागात वेरावली जलाशय व उर्वरित दुसऱ्या पाली इनलेट द्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वी 10 टक्के पाणी कपातबृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये 30 नोव्हेंबर 2024 रोजी तांत्रिक बिघाड झाला होता. हे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. 1 डिसेंबर 2024 ते 2 डिसेंबर 2024 रोजी दुरुस्ती काम सुरू होते. मात्र, या कामामुळे पाच दिवस पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर आणि उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे – भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. यामुळे 1 डिसेंबर 2024 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात आली होती.6 डिसेंबर रोजी पाणी कपात मागेमुंबई, ठाणे आणि भिवंडी शहरात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.हेही वाचामेट्रो 9 च्या कंत्राटदाराला 40 लाखांचा दंड
मुंबईला 250 नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळणार

Go to Source