ठाकरे शिवसेनेच्या प्रभारी उपजिल्हाप्रमुखपदी लक्ष्मण आयनोडकर
दोडामार्ग – वार्ताहर
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी लक्ष्मण कुसो आयनोडकर यांची उपजिल्हाप्रमुख (प्रभारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्त पत्र त्यांना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिले आहे.संघटना विस्तार, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय, तसेच पक्षाच्या भूमिकेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी त्यांनी पुढील काळात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळायची आहे. ही नियुक्ती जाहीर करताना शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आयनोडकर यांच्या कार्यक्षमतेची आणि निष्ठेची प्रशंसा करत भविष्यातील राजकीय, सामाजिक उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लक्ष्मण आयनोडकर यांनी शिवसेनेत विविध स्तरांवर जबाबदाऱ्या सांभाळत सातत्याने कार्य केले आहे. त्यांचा प्रवास हा एका समर्पित शिवसैनिकापासून सुरू होऊन शेतकरी सेना तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका संघटक आणि आता उपजिल्हाप्रमुख (प्रभारी) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देणार असल्याचे यावेळी आयनोडकर यांनी स्पष्ट केले आहे.
Home महत्वाची बातमी ठाकरे शिवसेनेच्या प्रभारी उपजिल्हाप्रमुखपदी लक्ष्मण आयनोडकर
ठाकरे शिवसेनेच्या प्रभारी उपजिल्हाप्रमुखपदी लक्ष्मण आयनोडकर
दोडामार्ग – वार्ताहर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी लक्ष्मण कुसो आयनोडकर यांची उपजिल्हाप्रमुख (प्रभारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्त पत्र त्यांना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिले आहे.संघटना विस्तार, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय, तसेच पक्षाच्या भूमिकेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी त्यांनी पुढील काळात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळायची आहे. ही नियुक्ती […]
