लॉरेन्स बिश्नोईच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत लॉरेन्स कथित स्वरुपात पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीला ईदच्या शुभेच्छा देताना दिसून येतो. लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात कैद आहे. यापूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्याप्रकरणी लॉरेन्स चर्चेत आला होता. या प्रकरणाची चौकशी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून स्थापन पथक करत आहे.
गुजरातच्या तुरुंगात कैद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून पाकिस्तानी डॉ भट्टीला व्हिडिओ कॉल करण्यात आल्यावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ जुना आहे की नवा याची चौकशी केली जाणार आहे. तसेच हा व्हिडिओ कुठून लीक झाला हे देखील शोधून काढले जाणार असल्याचे गुजरातचे मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले आहे.
पंजाबी गायक आणि काँग्रेसचा नेता सिद्धू मूसेवालाच्या हत्येतही लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले आहे. कॅनडात असलेला त्याचा साथीदार गोल्डी बराडने 29 मे 2022 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावानजीक मूसेवालाची हत्या घडवून आणली होती. 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. काळवीट शिकार प्रकरणामुळे तो सलमानवर नाराज आहे.
Home महत्वाची बातमी लॉरेन्स बिश्नोईच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
लॉरेन्स बिश्नोईच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत लॉरेन्स कथित स्वरुपात पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीला ईदच्या शुभेच्छा देताना दिसून येतो. लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात कैद आहे. यापूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्याप्रकरणी लॉरेन्स चर्चेत आला होता. या प्रकरणाची चौकशी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून स्थापन पथक करत […]
