चिंदर ग्रामपंचायतीच्या सेल्फीपाॅइंटचे निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

आचरा प्रतिनिधी लोकोपयोगी उपक्रम नेहमीच राबविणाऱ्या चिंदर ग्रामपंचायततर्फे ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर सेल्फी पाॅइंट उभारण्यात आले. या दोन सेल्फी पाॅइंटचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात झाले. सध्याच्या मोबाईल युगात तरुणाईला सेल्फीचे आकर्षण वाढले आहे. या सेल्फी मधून आपल्या गावाचे नाव सर्वदूर जावे ,गावाबद्दल आपलेपणा निर्माण व्हावा या उद्देशाने चिंदर ग्रामपंचायतने ग्रामपंचायत प्रवेशद्वाराच्या दोन्ही […]

चिंदर ग्रामपंचायतीच्या सेल्फीपाॅइंटचे निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

आचरा प्रतिनिधी
लोकोपयोगी उपक्रम नेहमीच राबविणाऱ्या चिंदर ग्रामपंचायततर्फे ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर सेल्फी पाॅइंट उभारण्यात आले. या दोन सेल्फी पाॅइंटचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात झाले. सध्याच्या मोबाईल युगात तरुणाईला सेल्फीचे आकर्षण वाढले आहे. या सेल्फी मधून आपल्या गावाचे नाव सर्वदूर जावे ,गावाबद्दल आपलेपणा निर्माण व्हावा या उद्देशाने चिंदर ग्रामपंचायतने ग्रामपंचायत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सेल्फी पाॅइंट उभारले आहेत. या उदघाटन प्रसंगी त्यांच्या सोबत अशोक सावंत,भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, चिंदर सरपंच सौ नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, मंगेश गावकर, देवस्थान समितीचे अरविंद घाडी, राजन गावकर, प्रकाश मेस्त्री, दत्ता वराडकर, संतोष गावकर, शेखर कांबळी,सचिन हडकर, विशाल गोलतकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.भगवती माउली यात्रोत्सवादिवशी येणाऱ्या भाविकांना हे सेल्फी पाॅइंट आकर्षण ठरले होते.त्यामुळे सेल्फी काढण्यासाठी गर्दी उसळली होती. या उपक्रमाबद्दल चिंदर सरपंच उपसरपंच यांनी लोकांचा सेल्फी काढण्यासाठी मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.