लालकृष्ण अडवाणींना ‘एम्स’मधून डिस्चार्ज

फॉलोअप चाचणी करण्याचा सल्ला वृत्तसंस्था /नवी दिल्ली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना नवी दिल्लीच्या ‘एम्स’मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती खालावल्यामुळे बुधवारी रात्री उशिरा त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्रभर करण्यात आलेल्या उपचारानंतर ते गुरुवारी दुपारी दिल्ली एम्सच्या खासगी वॉर्डमधून आपल्या अधिकृत निवासस्थानी रवाना झाले. डॉक्टरांनी त्यांना फॉलोअपसाठी येण्याचा […]

लालकृष्ण अडवाणींना ‘एम्स’मधून डिस्चार्ज

फॉलोअप चाचणी करण्याचा सल्ला
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना नवी दिल्लीच्या ‘एम्स’मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती खालावल्यामुळे बुधवारी रात्री उशिरा त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्रभर करण्यात आलेल्या उपचारानंतर ते गुरुवारी दुपारी दिल्ली एम्सच्या खासगी वॉर्डमधून आपल्या अधिकृत निवासस्थानी रवाना झाले. डॉक्टरांनी त्यांना फॉलोअपसाठी येण्याचा सल्ला दिला आहे. 96 वषीय लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्रीपासून एम्सच्या जेरियाट्रिक विभागातील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते.