अनंत अंबानींच्या खांद्यांवर लालबागचा राजा मंडळाची मोठी जबाबदारी

लालबागचा राजा या गणेश उत्सव मंडळामध्ये एका महत्त्वाच्या पदी, रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र (Anant Ambani) अनंत अंबानी यांचाही प्रवेश झाला आहे.  गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) काही तास शिल्लक असतानाच समोर आलेल्या बातमीनुसार अनंत अंबानींवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जवळपास महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंडळातील पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय एकमतानं घेतल्याचं सांगण्यात आलं. अनंत अंबानींवर या मंडळाच्या वतीनं मानद सदस्य म्हणून जबाबजदारी सोपवण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाची एकंदर धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे.  लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाप्रती अंबानी कुटुंबाची आत्मियता आणि त्यांचा सेवाभाव यामुशं मंडळाच्या प्रगतीलाही वाव मिळाला असून, त्यामुळंही मंडळात अनंतच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हेही वाचा ठाणे : 158 गणेश मंडळे अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत

अनंत अंबानींच्या खांद्यांवर लालबागचा राजा मंडळाची मोठी जबाबदारी

लालबागचा राजा या गणेश उत्सव मंडळामध्ये एका महत्त्वाच्या पदी, रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र (Anant Ambani) अनंत अंबानी यांचाही प्रवेश झाला आहे. गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) काही तास शिल्लक असतानाच समोर आलेल्या बातमीनुसार अनंत अंबानींवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जवळपास महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंडळातील पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय एकमतानं घेतल्याचं सांगण्यात आलं. अनंत अंबानींवर या मंडळाच्या वतीनं मानद सदस्य म्हणून जबाबजदारी सोपवण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाची एकंदर धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे. लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाप्रती अंबानी कुटुंबाची आत्मियता आणि त्यांचा सेवाभाव यामुशं मंडळाच्या प्रगतीलाही वाव मिळाला असून, त्यामुळंही मंडळात अनंतच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हेही वाचाठाणे : 158 गणेश मंडळे अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत

Go to Source