नवी मुंबई : थकबाकी न दिल्याने कामगाराकडून मालकाची हत्या

कळंबोली इथे कामगाराने मालकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली (Kalamboli) पोलिसांनी आरोपी सद्दाम हुसैन अन्सारी (30) याला 1,250 रुपयाची थकबाकी न दिल्याच्या वादातून परवेझ अन्सारी याची हत्या केली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेझ अन्सारी यांनी आरोपी सद्दाम हुसैन अन्सारी याला मजुरीसाठी ठेवले होते. तळोजा (Taloja) येथील एका खाजगी फर्ममध्ये परवेझ अन्सारी सुपरवायजर होता. त्याच्याकडे उर्वरित थकबाकी त्वरित देण्याची मागणी आरोपी सद्दाम हुसैन अन्सारी याने केल्यावर त्यांच्यात वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.  आरोपी सद्दाम हुसैन अन्सारी याने तात्काळ पैसे द्या अन्यथा कठोर पावले उचलली जातील अशी धमकी दिली होती. कळंबोलीच्या (Kalamboli) एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 14 जूनच्या रात्री सेक्टर 14 मध्ये ही घटना घडली, जिथे परवेझ अन्सारी कामगारांना पगार देणार होता. थकबाकीची पुर्तता केल्यानंतर, हुसेनने दावा केला की त्याच्याकडे अतिरिक्त 1,250 देणे बाकी आहे.  परवेझने रक्कम निकाली काढण्यासाठी 20 जूनपर्यंत आणखी मुदत मागितली होती. संतप्त झालेल्या हुसेनने त्याच्यावर चाकूने वार केले. “उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी परवेझवर हल्ला केला. या प्रक्रियेत अन्य दोन साथीदारही जखमी झाले आहेत,” असे अधिकाऱ्याने सांगितले. परवेझला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हुसेनला अटक करण्यात आली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 504 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.हेही वाचा नवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात नवी मुंबई: उत्पादन घटल्याने घाऊक बाजारात तांदळाच्या किमतीत वाढ

नवी मुंबई : थकबाकी न दिल्याने कामगाराकडून मालकाची हत्या

कळंबोली इथे कामगाराने मालकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली (Kalamboli) पोलिसांनी आरोपी सद्दाम हुसैन अन्सारी (30) याला 1,250 रुपयाची थकबाकी न दिल्याच्या वादातून परवेझ अन्सारी याची हत्या केली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेझ अन्सारी यांनी आरोपी सद्दाम हुसैन अन्सारी याला मजुरीसाठी ठेवले होते. तळोजा (Taloja) येथील एका खाजगी फर्ममध्ये परवेझ अन्सारी सुपरवायजर होता. त्याच्याकडे उर्वरित थकबाकी त्वरित देण्याची मागणी आरोपी सद्दाम हुसैन अन्सारी याने केल्यावर त्यांच्यात वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आरोपी सद्दाम हुसैन अन्सारी याने तात्काळ पैसे द्या अन्यथा कठोर पावले उचलली जातील अशी धमकी दिली होती. कळंबोलीच्या (Kalamboli) एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 14 जूनच्या रात्री सेक्टर 14 मध्ये ही घटना घडली, जिथे परवेझ अन्सारी कामगारांना पगार देणार होता. थकबाकीची पुर्तता केल्यानंतर, हुसेनने दावा केला की त्याच्याकडे अतिरिक्त 1,250 देणे बाकी आहे. परवेझने रक्कम निकाली काढण्यासाठी 20 जूनपर्यंत आणखी मुदत मागितली होती. संतप्त झालेल्या हुसेनने त्याच्यावर चाकूने वार केले. “उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी परवेझवर हल्ला केला. या प्रक्रियेत अन्य दोन साथीदारही जखमी झाले आहेत,” असे अधिकाऱ्याने सांगितले.परवेझला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हुसेनला अटक करण्यात आली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 504 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.हेही वाचानवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपातनवी मुंबई: उत्पादन घटल्याने घाऊक बाजारात तांदळाच्या किमतीत वाढ

Go to Source