कुवेत: मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत

कुवेत मध्ये एका इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 40 पेक्षा जास्त भारतीय होते. तर जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जिथे जखमींवर उपचार सुरु आहे. कुवेत अग्निकांडमधील पीडितांना आर्थिक मदत करण्याची …

कुवेत: मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत

कुवेत मध्ये एका इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 40 पेक्षा जास्त भारतीय होते. तर जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जिथे जखमींवर उपचार सुरु आहे. 

 

कुवेत अग्निकांडमधील पीडितांना आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबांना 2 लाखांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान कोषामधून ही आर्थिक मदत देण्यात येईल. काल कुवेत मध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये 49 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 40 जण भारतीय असल्याची माहिती मिळाली असून त्यांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये दक्षिण भरतील लोकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

मृतांना आणण्यासाठी केंद्रीय विदेश मंत्री कीर्तिवर्धन सिंह कुवेत ला रवाना झाले आहे. तसेच जखमी भारतीयांची विचारपूरस देखील करतील. कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की, आम्ही पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेतली. तसेच मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. 

 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source