कुर्ला बस अपघात : शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांचे स्पष्टीकरण
मुंबईतील (mumbai) कुर्ला (kurla) येथे भरधाव वेगात आलेल्या बेस्ट (best) बसने आठ ते दहा वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना (accident) सोमवारी रात्री घडली. ताज्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात अद्याप 49 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.शिवसेना (शिंदे) कुर्ल्यातील आमदार दिलीप लांडे (dilip lande) यांनी काल रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा अपघात कशामुळे झाला? अशी प्राथमिक माहिती देण्यात आली.एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीप लांडे म्हणाले की, कुर्ला स्थानकातून निघालेल्या बसचे (bus) ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले. यामुळे चालक घाबरला आणि त्याने ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाऊल ठेवले. त्यामुळे बसचा वेग वाढला. त्यामुळे बस नियंत्रणाबाहेर जाऊन काही वाहनांना धडकली. जखमींना उपचारासाठी सेव्हन हिल, राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आले आहे. जखमी रुग्णांना माहिती देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अपघाताबाबत माहिती देताना डीसीपी झोन 5 चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले की, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता का? याबाबत गावडे यांना विचारले असता, अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे सांगितले.या अपघातात आफरीन शाह (19), अनम शेख (20), कनिश कादरी (55) आणि शिवम कश्यप (18) यांचा मृत्यू झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधला. त्यापैकी झीशान अन्सारी म्हणाले, “मी माझ्या मित्रांसोबत रॉयल स्ट्रीट्सच्या दुकानाबाहेर उभा होतो, तेव्हा मला एक बस वेगाने येताना दिसली.” बुद्ध कॉलनीत प्रवेश करण्यापूर्वी बसने अनेक वाहने आणि अधिकाऱ्यांना धडक दिली होती. आम्ही धावत जाऊन बस चालकाला बसमधून बाहेर काढले.”हेही वाचाभरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यताखारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
Home महत्वाची बातमी कुर्ला बस अपघात : शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांचे स्पष्टीकरण
कुर्ला बस अपघात : शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांचे स्पष्टीकरण
मुंबईतील (mumbai) कुर्ला (kurla) येथे भरधाव वेगात आलेल्या बेस्ट (best) बसने आठ ते दहा वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना (accident) सोमवारी रात्री घडली.
ताज्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात अद्याप 49 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना (शिंदे) कुर्ल्यातील आमदार दिलीप लांडे (dilip lande) यांनी काल रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा अपघात कशामुळे झाला? अशी प्राथमिक माहिती देण्यात आली.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीप लांडे म्हणाले की, कुर्ला स्थानकातून निघालेल्या बसचे (bus) ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले.
यामुळे चालक घाबरला आणि त्याने ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाऊल ठेवले. त्यामुळे बसचा वेग वाढला. त्यामुळे बस नियंत्रणाबाहेर जाऊन काही वाहनांना धडकली.
जखमींना उपचारासाठी सेव्हन हिल, राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आले आहे. जखमी रुग्णांना माहिती देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या अपघाताबाबत माहिती देताना डीसीपी झोन 5 चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले की, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता का? याबाबत गावडे यांना विचारले असता, अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे सांगितले.
या अपघातात आफरीन शाह (19), अनम शेख (20), कनिश कादरी (55) आणि शिवम कश्यप (18) यांचा मृत्यू झाला.
काही प्रत्यक्षदर्शींनी हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधला. त्यापैकी झीशान अन्सारी म्हणाले, “मी माझ्या मित्रांसोबत रॉयल स्ट्रीट्सच्या दुकानाबाहेर उभा होतो, तेव्हा मला एक बस वेगाने येताना दिसली.”
बुद्ध कॉलनीत प्रवेश करण्यापूर्वी बसने अनेक वाहने आणि अधिकाऱ्यांना धडक दिली होती. आम्ही धावत जाऊन बस चालकाला बसमधून बाहेर काढले.”हेही वाचा
भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता
खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर