‘कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ संस्थेचा पहिला वर्धापनदिन! विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात साजरा
रत्नागिरी : प्रतिनिधी
कुणबी जोडो अभियानांतर्गत कोकणातील प्रत्येक तालुक्याचा दौरा केला असता प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कुणबी समाजाचा आर्थिक मागासलेपण. हेच मागासले पण दूर व्हावे यासाठी कुणबी समाजाचे श्री अशोक दादा वालम यांच्या संकल्पनेतून कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज निर्मिती झाली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील नामवंत उद्योजकांना जोडून यांच्या सहकार्याने नवउद्योजक तयार करण्याचे काम सुरू आहे.
शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथालय गावस्कर हॉल येथे या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री.प्रेमनाथ ठोंबरे साहेब यांनी आपल्या प्रेजेनटेशन द्वारा KCCI च्या वर्षभराचा केलेल्या कामाचा आढावा प्रसिद्ध केला. यावेळी समाजातील अनेक उद्योजक नवउद्योजकांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी समाजातील तरुण पिढी उच्चशिक्षित झाली पाहिजे हा विचार नजरेसमोर ठेवून संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले तदप्रसंगी उद्योजक व शैक्षणिक क्षेत्रातील तसेच कुणबी समाजोन्नती संघाचे हंगामी अध्यक्ष श्री.सदानंद कास्टे व इतर पदाधिकारी उपस्थित होते, तसेच कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थापक श्री.अशोक वालम साहेब, माजी कुलगूरु डाॅ. अरुण सावंत सर , जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री. निलेश सांबरे साहेब, उद्योजक श्री. वसंत उदेग साहेब, हाॅटेल उद्योजक श्री. प्रकाश बाईत साहेब असे दिग्गज मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा नवतरुणांना निश्चितच होईल अशी आशा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनाबद्दल कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनसोक्त कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपून वृध्दाश्रम चालविणारे सौ . शर्मिला पडीये ताई , शिक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सौ .संध्या बापेकर , यांचा विशेष सत्कार संस्थे मार्फत करण्यात आला . उद्योग क्षेत्रात गरिबीतून व्यवसाय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे श्री .अनुपम म्हसकर आणि श्री . संतोष शिगवण, श्री.तुषार माने, श्री. रवि मते , श्री. पाडूरंग शिवगण, श्री. उदय बाईत, सौ.दिक्षीता पाटील यांचा सुद्धा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला . या सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच संस्थेला मोलाचे सहकार्य केलेले आहे .