कुंभी कारखान्याने मागील दोन हंगामातील जादाची बिले त्वरित द्यावीत! शेतकरी संघटना, शाहू आघाडीची मागणी

कुडीत्रे ता.करवीर येथील कुंभी कासारी कारखान्याने सन 2022 – 23 मधील उसाला एफआरपी अधिक प्रतिटन 50 रुपये व 2023 – 24 या वर्षीच्या गाळप हंगामामधील ऊसाला एफआरपी अधिक 100 रूपये वार्षिक सर्वसाधारण सभा होण्यापूर्वी शेतक्रयांच्या खात्यावर वर्ग करावेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व शेतकरी संघटना व शाहू आघाडीने कारखाना प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला आहे. […]

कुंभी कारखान्याने मागील दोन हंगामातील जादाची बिले त्वरित द्यावीत! शेतकरी संघटना, शाहू आघाडीची मागणी

कुडीत्रे ता.करवीर येथील कुंभी कासारी कारखान्याने सन 2022 – 23 मधील उसाला एफआरपी अधिक प्रतिटन 50 रुपये व 2023 – 24 या वर्षीच्या गाळप हंगामामधील ऊसाला एफआरपी अधिक 100 रूपये वार्षिक सर्वसाधारण सभा होण्यापूर्वी शेतक्रयांच्या खात्यावर वर्ग करावेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व शेतकरी संघटना व शाहू आघाडीने कारखाना प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष बाजीराव देवाळकर,ज्ञानदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी संचालक धिरजकुमार माने, व्हाईस चेअरमन राहूल खाडे, संचालक अँड. बाजीराव शेलार, विलास पाटील, किशोर पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
नि.कॅप्टन उत्तम पाटील यांनी विठ्ठल साखर कारखाना सव्वा नऊ टक्के रिकव्हरी असताना जर 3500 दर जाहीर करत असेल तर कुंभीची रिकव्हरी जवळजवळ तेरा टक्के असल्याने या कारखान्याने सभासदांना प्रति टन चार हजार पाचशे दर देणे शक्य असल्याचे सांगितले.बाजीराव देवाळकर यांनी मागील येणे 150 रुपये द्यावे अशी मागणी केली. राजेंद्र सुर्यवंशी यांनी निवेदन देण्यास वेळ मागुनही चेअरमन यांनी वेळ दिला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी सज्जन पाटील, टी. एल. पाटील, जगदीश पाटील, बाळासो पाटील, कुंडलिक केंबळकर यांनी मते मांडली.
कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी सन 2022 – 23 मध्ये 3100 एफआरपी होती, त्यावेळी 3150 रुपये दिले असून शासनाला कळविले आहे.तसेच 2023 – 24 मध्ये 3160, रुपये दर होता,त्यावेळी 3200 रूपये दिल्याचे सांगितले.
यावेळी संघटनेचे कार्यकर्ते सुभाष पाटील,उत्तम पाटील, गुणाजी शेलार, ज्ञानदेव पाटील, पांडूरंग शिंदे, सुनील कापडे, रंगराव पाटील, विष्णू राऊत, बाबासो पलसकर, बाजीराव पाटील, रंगराव कळके, बळीराम पाटील, जयदीप पाटील, सरदार पाटील यांच्यासह स्वाभिमानी, शरद जोशी, रघुनाथ दादा पाटील, आझाद हिंद क्रांती, संघटना, राजर्षी शाहू आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
कुडीत्रे. कुंभी कासारीचे व्हाईस चेअरमन राहुल खाडे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी निवेदन देताना शेतकरी संघटनेचे बाजीराव देवळकर,राजेंद्र सूर्यवंशी, उत्तम पाटील,सज्जन पाटील,कार्यकर्ते व शेतकरी