कुकना अजय सिंग 5 बळी
वृत्तसंस्था/ जोधपूर
2024 च्या रणजी हंगामातील येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या इलाईट अ गटातील सामन्यात राजस्थानने महाराष्ट्राला पहिल्या डावात 189 धावावर रोखले. त्यानंतर दिवसअखेर राजस्थानने 26 षटकात 2 बाद 110 धावा जमवित चोख प्रत्युत्तर दिले.
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी दिली. राजस्थानच्या कुकना अजयसिंगच्या अचूक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राला फटकेबाजी करता आली नाही. त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक नोंदवता आले नाही. कर्णधार केदार जाधवने 1 षटकार आणि 4 चौकारासह 42, निखिल नाईकने 1 षटकार आणि 3 चौकारासह 48, अंकित बामनेने 2 चौकारासह 17, पिनल शहाने 4 चौकारासह 29, आशय पालकरने 4 चौकारासह 35 धावा जमवल्या. राजस्थानच्या कुकना अजयसिंगने 75 धावात 5 तर अरफात खानने 3 गडी बाद केले. चौधरी आणि लोमरोर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थानने दिवसअखेर पहिल्या डावात 26 षटकात 2 बाद 110 धावा जमवल्या. अभिजित तोमर 2 चौकारासह 13 धावावर तर यश कोठारी 2 चौकारासह 12 धावा बाद झाले. महाराष्ट्राच्या वळूंजने हे दोन गडी बाद केले. करण लांबा 1 षटकार आणि 5 चौकारासह 45 तर कर्णधार दीपक हुडा 1 षटकार आणि 4 चौकारासह 36 धावावर खेळत असून या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 77 धावांची अभेद्य भागीदारी केली. महाराष्ट्रातर्फे वळूंजने 52 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र 55.5 षटकात सर्वबाद 189 (पिनल शहा 29, पालकर 35, बावने 17, केदार जाधव 42, निखिल नाईक 48, सोळंकी नाबाद 10, कुकना अजयसिंग 5-75, अराफत खान 3-34, अंकित चौधरी आणि मेहपाल लोमरोर प्रत्येकी एक बळी), राजस्थान प. डाव 26 षटकात 2 बाद 110 (करण लांबा खेळत आहे 45, दीपक हुडा खेळत आहे 36, तोमर 13, कोठारी 12, अवांतर 4, वळूंज 2-52).
Home महत्वाची बातमी कुकना अजय सिंग 5 बळी
कुकना अजय सिंग 5 बळी
वृत्तसंस्था/ जोधपूर 2024 च्या रणजी हंगामातील येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या इलाईट अ गटातील सामन्यात राजस्थानने महाराष्ट्राला पहिल्या डावात 189 धावावर रोखले. त्यानंतर दिवसअखेर राजस्थानने 26 षटकात 2 बाद 110 धावा जमवित चोख प्रत्युत्तर दिले. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी दिली. राजस्थानच्या कुकना अजयसिंगच्या अचूक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राला फटकेबाजी करता आली नाही. त्यांच्या एकाही […]