कामेवाडी क्रिकेट स्पर्धेत कुद्रेमनी संघ विजेता

वार्ताहर /कुद्रेमनी चंदगड तालुक्यातील कामेवाडी (कोवाड भाग) गावात नुकत्याच झालेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये कुद्रेमनी गावच्या क्रिकेट संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवून चषक जिंकला. विविध तालुक्यातील चोवीस पेक्षाअधिक क्रिकेट संघानी स्पर्धेत सहभाग घेतला होता. उपांत्य सामन्यात पार्ले (चंदगड) व अंतिम सामान्यात तुरमुरी (बेळगाव) क्रिकेट संघावर मात केली. या स्पर्धेत कुद्रेमनी संघाचा खेळाडू परशराम पन्हाळकर याना सामनावीर व […]

कामेवाडी क्रिकेट स्पर्धेत कुद्रेमनी संघ विजेता

वार्ताहर /कुद्रेमनी
चंदगड तालुक्यातील कामेवाडी (कोवाड भाग) गावात नुकत्याच झालेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये कुद्रेमनी गावच्या क्रिकेट संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवून चषक जिंकला. विविध तालुक्यातील चोवीस पेक्षाअधिक क्रिकेट संघानी स्पर्धेत सहभाग घेतला होता. उपांत्य सामन्यात पार्ले (चंदगड) व अंतिम सामान्यात तुरमुरी (बेळगाव) क्रिकेट संघावर मात केली. या स्पर्धेत कुद्रेमनी संघाचा खेळाडू परशराम पन्हाळकर याना सामनावीर व दुंडगे (चंदगड) संघाचा खेळाडू हनमंत याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. कुद्रेमनी क्रिकेट संघामध्ये शंकर तुर्केवाडकर, आकाश पाटील, चाळोबा पाटील, विनायक काकतकर, संभाजी पन्हाळकर, राहुल लोहार, राजू गुरव, सुनील मुरकुटे, ज्ञानेश्वर नाईक, भाऊ पन्हाळकर, संतोष पाटील, सौरभ लोहार यांचा समावेश होता. त्यांच्या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.