पक्षाने आदेश दिला तर ‘कृष्णराज’ नक्कीच विधानसभा लढवतील- धनंजय महाडिक

कृष्णराज महाडिक हे युट्युबवरील कोल्हापुरातील सगळ्यात लोकप्रिय युट्युबर आहेत. त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळे लोकभावना असतील आणि पक्षाने जर आदेश दिला तर ते नक्कीच विधानसभेला उतरतील आणि चांगली कामगिरी करतील असा विश्वास भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापुरात आज भाजपतर्फे कोल्हापूर लोकसभेच्या जागेला आलेल्या अपयशा संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली. या […]

पक्षाने आदेश दिला तर ‘कृष्णराज’ नक्कीच विधानसभा लढवतील- धनंजय महाडिक

कृष्णराज महाडिक हे युट्युबवरील कोल्हापुरातील सगळ्यात लोकप्रिय युट्युबर आहेत. त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळे लोकभावना असतील आणि पक्षाने जर आदेश दिला तर ते नक्कीच विधानसभेला उतरतील आणि चांगली कामगिरी करतील असा विश्वास भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापुरात आज भाजपतर्फे कोल्हापूर लोकसभेच्या जागेला आलेल्या अपयशा संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांचे डिजिटल फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. बऱ्याच डिजिटलवर कृष्णराज यांचा उल्लेख भावी आमदार असा करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्हाभरात कृष्णराज महाडिक हे विधानसभेला शड्डू ठोकणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
याबाबतच आज माध्यमांनी कृष्णराज महाडिक यांचे वडील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना याबाबत छेडले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “विश्वराज महाडिक हे फक्त कोल्हापुरातीलच नाही तर मराठी म्हणून सगळ्यात लोकप्रिय youtube वर आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कोल्हापुरात चांगलीच आहे. त्यांचे काही फॅन्स आणि त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचे डिजीटल पुर्ण शहरात लावले आहेत. आपण त्यांच्या भावनेचा आदर राखला पाहीजे. पण तरीही जर लोक भावना असतील आणि पक्षाने तसा आदेश दिला तर कृष्णराज नक्कीच विधानसभा लढवतील.एव्हडेच नाही तर त्यात ते चांगली कामगिरी करतील” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.