कृष्णा-प्रतीक यांचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ ओर्लेन्स (फ्रान्स) विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या ओर्लेन्स मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या कृष्ण प्रसाद गर्ग आणि साई प्रतीक यांचे पुरूष दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. या स्पर्धेतील पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या सोंडेरगार्ड आणि जेस्पर टॉफ्ट यांनी कृष्णा आणि प्रतीक यांचा 21-17, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये 40 मिनिटात पराभव करत […]

कृष्णा-प्रतीक यांचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ ओर्लेन्स (फ्रान्स)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या ओर्लेन्स मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या कृष्ण प्रसाद गर्ग आणि साई प्रतीक यांचे पुरूष दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
या स्पर्धेतील पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या सोंडेरगार्ड आणि जेस्पर टॉफ्ट यांनी कृष्णा आणि प्रतीक यांचा 21-17, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये 40 मिनिटात पराभव करत उपांत्य फेरी गाठली. सदर स्पर्धा ही सुपर 300 दर्जाची ओळखी जाते. कृष्णा आणि प्रतीक यांच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.