केआर शेट्टी संघाने पटकावला तनिष्क चषक

टिळकवाडी क्लब संघ उपविजेता : नासीर पठाण सामनावीर, रोहित दोड्डवाड मालिकावीर
बेळगाव : तनिष्क स्पोर्ट्स क्लब आयोजित तनिष्क चषक वरिष्ठांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केआर शेट्टी किंग्ज संघाने टिळकवाडी क्रिकेट संघाचा 5 गड्यांनी पराभव करून तनिष्क चषक पटकाविला. नासीर पठाण याला सामनावीर तर रोहित दोड्डवाड याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात टिळकवाडी क्लबने प्रथम फलंदाजी करताना 24.1 षटकात सर्वगडी बाद 138 धावा केल्या. रोहित दोड्डवाडने 1 षटकार व 4 चौकारांसह 50 धावा तर शिवलिंगने 2 षटकार, 4 चौकारांसह 42 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे नासीर पठाणने 41 धावात 4, तर रब्बानी दफेदारने 17 धावात 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना केआर शेट्टी किंग्जने 20 षटकात 5 गडी बाद 142 धावा केल्या. संतोष सुळगे-पाटीलने 8 चौकारासह 44, तर सद्दामने 4 चौकारांसह 26 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे रोहित दोड्डवाडने 35 धावात 2 तर ओमकारने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्लॅटिनम ज्युबिली मैदानाचे चेअरमन आनंद सराफ, ज्येष्ठ क्रिकेटपटू विवेक पाटील, भीमाप्पा कांबळे, सुधीर भोसले, प्रणय शेट्टी, रवी पिल्ले आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या केआर शेट्टी व उपविजेत्या टिळकवाडी क्लब संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रुक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर नासीर पठाण-केआर शेट्टी, उत्कृष्ट फलंदाज गुरुप्रसाद पोतदार- टिळकवाडी, उत्कृष्ट गोलंदाज अक्षय जगताप- केआर शेट्टी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रणय शेट्टी तर मालिकावीर रोहित दोड्डवाड यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओमकार चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Home महत्वाची बातमी केआर शेट्टी संघाने पटकावला तनिष्क चषक
केआर शेट्टी संघाने पटकावला तनिष्क चषक
टिळकवाडी क्लब संघ उपविजेता : नासीर पठाण सामनावीर, रोहित दोड्डवाड मालिकावीर बेळगाव : तनिष्क स्पोर्ट्स क्लब आयोजित तनिष्क चषक वरिष्ठांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केआर शेट्टी किंग्ज संघाने टिळकवाडी क्रिकेट संघाचा 5 गड्यांनी पराभव करून तनिष्क चषक पटकाविला. नासीर पठाण याला सामनावीर तर रोहित दोड्डवाड याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात टिळकवाडी क्लबने प्रथम फलंदाजी […]
