कोरियाची टॉप सिडेड अॅन यंग स्पर्धेबाहेर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कोरियाची टॉप सिडेड आणि विद्यमान विजेती अॅन सी यंगला दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्धवट सोडावा लागला. यंगने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंगापूरची जिया मिन येवोला पुढे चाल मिळाली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना 21 वर्षीय सी […]

कोरियाची टॉप सिडेड अॅन यंग स्पर्धेबाहेर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरु असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कोरियाची टॉप सिडेड आणि विद्यमान विजेती अॅन सी यंगला दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्धवट सोडावा लागला. यंगने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंगापूरची जिया मिन येवोला पुढे चाल मिळाली आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना 21 वर्षीय सी यंगला दुखापत झाली होती. तिला गुडघ्याला झालेली दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसतानाही तिने इंडियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्याचे धाडस केले. शुक्रवारच्या सामन्यात अॅन यंग पिछाडीवर होती. गेल्या आठवड्यात टॉप सिडेड आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेती अॅन सी यंगने मलेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. सिंगापूरच्या जिया मिन येवोची पुढील फेरीतील लढत माजी टॉप सिडेड तेई झूशी होणार आहे. माजी टॉप सिडेड तेई झू यांगने चीनच्या सहाव्या मानांकित ही जियावोचा 21-12, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला.
पुरुष एकेरीमध्ये हाँगकाँगचा 18 वा मानांकित ली चेयुक युने टोकियो ऑलिम्पिक कास्यपदक विजेत्या अॅन्थोनी सिनीसुकाचा 21-17, 18-21, 21-13 असा पराभव केला होता.