दहावीच्या निकालात कोकण पुन्हा एकदा टॉप !
राज्याचा निकाल ९५. ८१ तर , कोकण विभाग ९९. ०१ टक्क्यांसह अव्वल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे.
राज्यात कोकण विभागातील ९९.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर यंदा नागपूर विभागाचा निकाल ९४.७३. टक्के असा सर्वात कमी लागला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आली होती.
विभागनिहाय निकालाची एकूण टक्केवारी मंडळामार्फत नुकतीच जाहीर करण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44 नागपुर – 94.73 संभाजीनगर – 95.19 मुंबई – 95.83 कोल्हापूर – 97.45 अमरावती – 95.58 नाशिक – 95.28 लातूर – 95.27 कोकण – 99.01
