सेंट जोसेफकडे कोल्हापुरे चषक

उत्कृष्ट खेळाडू साक्षी चिटगी, उत्कृष्ट गोलरक्षक तारा सौदागर, उत्कृष्ट बचावपटू  किंजल तलवार बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक संघटना शिवाजी कॉलनी  आयोजित दिलीप कोल्हापुरे स्मृतिचषक आंतरशालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  सेंट जोसेफने  सेंट झेवियर्सचा सडनडेथमध्ये 3-2  अशा गोलफरकाने पराभव करून दिलीप कोल्हापुरे चषक पटकाविला.उत्कृष्ट खेळाडू साक्षी चिटगी, उत्कृष्ट बचावपटू  किंजल तलवार, उत्कृष्ट गोलरक्षक तारा सौदागर […]

सेंट जोसेफकडे कोल्हापुरे चषक

उत्कृष्ट खेळाडू साक्षी चिटगी, उत्कृष्ट गोलरक्षक तारा सौदागर, उत्कृष्ट बचावपटू  किंजल तलवार
बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक संघटना शिवाजी कॉलनी  आयोजित दिलीप कोल्हापुरे स्मृतिचषक आंतरशालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  सेंट जोसेफने  सेंट झेवियर्सचा सडनडेथमध्ये 3-2  अशा गोलफरकाने पराभव करून दिलीप कोल्हापुरे चषक पटकाविला.उत्कृष्ट खेळाडू साक्षी चिटगी, उत्कृष्ट बचावपटू  किंजल तलवार, उत्कृष्ट गोलरक्षक तारा सौदागर यांना गौरवण्यात आले. येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट जोसेफने संत मीराचा 1-0 असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्सने डी.पी.चा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात  बलाढ्या सेंट जोसेफ संघाला झुंजार खेळाचे प्रदर्शन घडविणाऱ्या सेंट झेवियर्स संघाने कडवी झुंज दिली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आल्याने पंच कौशिक पाटील यांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला.
टायब्रेकरमध्येही दोन्ही संघानी 2-2 अशी बरोबरी साधली. त्यामुळे पंचांनी सडनडेथचा निर्णय घेतला. सडनडेथमध्ये सेंट जोसेफने 3-2 असा सामना जिंकून विजेतेपद मिळविले. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे आनंद चव्हाण, श्रीकांत फगरे, राकेश कांबळे, सागर भोसले, पवन कांबळे, दीपा भंडारी, श्वेता खांडेकर, संतोष दळवी, विक्रम कदम, स्वप्नील पाटील, विशाल राऊत, जयराम बांदेकर, अमित पाटील, गोपाळ खांडे, विकी मन्नोळकर, मनोज खांडेकर, संजय कोल्हापूरे, शांताप्पा नरगोडी, जॅकी मस्करनस, वसंत हेब्बाळकर, विलास बसरीमरद, सेंट झेवियर्सचे फादर सिरीयल बिगेज, स्नेहा दळवी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी आकर्षक चषक राकेश कांबळे यांनी पुरस्कृत केले होते. पंच म्हणून कौशिक पाटील, यश सुतार, सुदर्शन चौगले, उमेश मजूकर, अखिलेश अष्टेकर यांनी काम पाहिले. समालोचक निवृत्त शिक्षक वाय. पी. नाईक, विनायक धामणेकर, शिरीष चौगुले यांनी केले.