दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात माण येथील युवक जागीच ठार

शाहूवाडी प्रतिनिधी ओकोली- शाहूवाडी मार्गावरील ओकोली येथील बटरफ्लाय शाळेसमोरील रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात एका  दुचाकी वरील विकास महिपती पाटील वय-३६ रा.माण हा युवक जागीच ठार झाला .   दुसऱ्या दुचाकीवरील  अनिल दगडू पाटील रा.ओकोली हा जखमी झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.याबाबत समीर सुभाष पाटील यांनी फिर्याद दिली आहे.हा अपघात बुधवार दि.१७ जानेवारी रोजी […]

दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात माण येथील युवक जागीच ठार

शाहूवाडी प्रतिनिधी

ओकोली- शाहूवाडी मार्गावरील ओकोली येथील बटरफ्लाय शाळेसमोरील रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात एका  दुचाकी वरील विकास महिपती पाटील वय-३६ रा.माण हा युवक जागीच ठार झाला .   दुसऱ्या दुचाकीवरील  अनिल दगडू पाटील रा.ओकोली हा जखमी झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.याबाबत समीर सुभाष पाटील यांनी फिर्याद दिली आहे.हा अपघात बुधवार दि.१७ जानेवारी रोजी रात्री घडला आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, अनिल दगडु पाटील हा मोटर सायकलस्वार ओकोलीकडून शाहूवाडीकडे आपल्या ताब्यातील सप्लेंडर मोटरसायकल, निष्काळजीपणाने चालवून जात असता . समोरून येणारी शाईन मोटार सायकल  या गाडीस समोरून धडक दिली . या झालेल्या अपघातात विकास महिपती पाटील रा.माण हा जागीच ठार झाला . तर दुसरा मोटार सायकलस्वार अनिल दगडू पाटील हा जखमी झाला.हा अपघात ओकोली गावच्या हद्दीत ओकोली- शाहुवाडी जाणा-या रोडवर बटर फ्लाय शाळेचे समोर झाला. विकास पाटीलच्या मृत्यूस कारणीभूत व स्वत: स जखमी केल्याबद्दल अनिल पाटील यांच्या विरोध शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील हे करीत आहेत.