वाळूने भरलेला ट्रक विहिरीत कोसळला ? जीवितहानी नाही, यळगुडमधीळ घटना

हुपरी(वार्ताहर) यळगुड तालुका हातकणंगले येथील कागल रोडला अनेक वर्षापासून पडीक असणाऱ्या विहीरत सकाळी सव्वा सहाच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रक भरगाव वेगाने जात असताना विहिरीत कोसळला.पाणी आणि गाळ जास्त प्रमाणात असल्याने ट्रक क्षणातच पाण्यात बुडून गायब झाला. ट्रकमध्ये ड्रायव्हरसह तिघेजण असतात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. काळ आला होता पण वेळ नाही म्हणून तिघेजण बचावले. […]

वाळूने भरलेला ट्रक विहिरीत कोसळला ? जीवितहानी नाही, यळगुडमधीळ घटना

हुपरी(वार्ताहर)
यळगुड तालुका हातकणंगले येथील कागल रोडला अनेक वर्षापासून पडीक असणाऱ्या विहीरत सकाळी सव्वा सहाच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रक भरगाव वेगाने जात असताना विहिरीत कोसळला.पाणी आणि गाळ जास्त प्रमाणात असल्याने ट्रक क्षणातच पाण्यात बुडून गायब झाला. ट्रकमध्ये ड्रायव्हरसह तिघेजण असतात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. काळ आला होता पण वेळ नाही म्हणून तिघेजण बचावले. रात्रीच्या वेळी ट्रकचा भीषण अपघात झाला असल्याने कोणताही प्रकारचा धोका झाला नाही.
दरम्यान क्रेनच्या साहाय्याने ट्रक वर काढण्यात आला आला .बघ्यांची मोठी गर्दी झाली होती .
यळगुड येथील गावाच्या बाहेर अनेक वर्षांपासून वापरात नसलेली रस्त्याकडेला असलेल्या पडीक विहिरीचा कठडा तोडून वाळूने भरलेला ट्रक विहिरीत कोसळला. ट्रक वाळू भरून कागलकडे जात असताना थोडा अंधार होता. गाडी वेगात होती. समोरून लाईट लावून ट्रक आल्याने हतबल होऊन विहिरीत कोसळला. ट्रक वाळुसह विहिरीत पूर्णपणे बुडाला आहे. ट्रक मध्ये चालक , हमाल अन्य एक जण असे तिघे होते. ट्रक मधून तिघांनी उड्या मारत आपला जीव वाचवला. दोघे पोहत काठावर आले. तर पोहता येत नसल्याने एक जण विहिरीतील झाडाच्या फांद्याना धरून बसला होता. त्यास लोकांनी विहिरीत आधार देत विहिरी बाहेर काढले. ही घटना आज शनिवारी सकाळी सहा च्या सुमारास घडली. पोलिस दाखल झाले आहेत. बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे