कोल्हापूर: ‘भोगावती’च्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत राशिवडेच्या मल्लांचे वर्चस्व
Bharat Live News Media वृत्तसेवा : शाहूनगर परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कारखान्याने आयोजित केलेल्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत राशिवडे बुद्रुक च्या मल्लांनी वर्चस्व राखले. ११ पैकी ८ गटात राशिवडेच्या मल्लांनी विजेतेपद व ३ गटात उपविजेतेपद मिळवले. या स्पर्धेत १०७ मल्लांनी भाग घेतला होता.
८० ते ९० किलो गटात प्रतिक म्हेतरने तर ६६ किलो गटात राशिवडेच्या सौरभ पाटील याने सलग १० गुण घेत निर्विवाद विजय मिळवला.
विविध वजन गटातील मानधनधारक मल्ल पुढील प्रमाणे –
२५ किलो गट- अर्णव संदीप डकरे (राशिवडे बुं)
३०किलो गट-साईराज प्रकाश गोनुगडे(राशिवडेबु)
३५ किलो गट- श्रेयस संदीप तापेकर (राशिवडे बु)
४० किलो गट- तनिष्क सचिन डकरे (राशिवडे बु)
४५ किलो गट- तिर्थ संजय डकरे ( राशिवडे बु)
५० किलो गट- ओम प्रकाश कोईगडे( कुरुकली)
५५ किलो गट- दिग्विजय भैरु पाटील( कुर्डू)
६० किलो गट- मृणाल मारुती पाटील( बेले)
६६ किलो गट- ओंकार केरबा लाड( राशिवडे बु)
६६ ते८०किलो- सौरभ अशोक पाटील(राशिवडे बु)
८० ते९० किलो प्रतिक पंडीत म्हेतर ( राशिवडे बु)
प्रारंभी संचालक मारुतराव जाधव यांच्या हस्ते आखाडा पुजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, संचालक ए. डी. चौगले, केरबा भाऊ पाटील, रघुनाथ जाधव, प्रा. सुनिल खराडे, शिवाजी कारंडे, पांडुरंग पाटील, माजी संचालक विश्वनाथ पाटील, वसंतराव पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, शिवाजीराव पाटील कौलवकर आदी उपस्थित होते.
यावेळी पंच म्हणून संभाजी वरुटे, संभाजी पाटील, प्रकाश खोत, आनंदा खराडे, भरत कळंत्रे, तानाजी पाटील, रविंद्र पाटील, विलास पाटील, सिकंदर कांबळे, बाळासो मेटकर, दादू चौगले यांनी काम पाहिले. कृष्णात चौगले, राजाराम चौगले यांनी निवेदन केले.
हेही वाचा
कोल्हापूर : तळसंदे येथे नातवाला शाळेत सोडून येताना दुचाकीच्या धडकेत आजोबा ठार
कोल्हापूर : सलग सुट्ट्यांमुळे किणी टोल नाक्यासह महामार्गावर वाहनांची गर्दी
कोल्हापूर: पुणे- बंगळूर महामार्गावर पिलर टाकण्यासाठी गुरूवारी काम रोखणार; घुणकीतील शेतकऱ्यांचा इशारा
Read Latest Marathi News : कोल्हापूर: ‘भोगावती’च्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत राशिवडेच्या मल्लांचे वर्चस्व Only On : Bharat Live News Media.