दिवाळीत कोल्हापूर एसटी महामंडळ मालामाल
दिवाळीत एसटी महामंडळ कोल्हापूरच्या विभागात कोल्हापूरहून पुणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव, लातूर, कोकण जिल्ह्यासाठी प्रवाशांसाठी ग्रामीण भागात जाण्यासाठी 9नोव्हेंबर पासून विशेष बस सोडण्यात आल्या आहे. या अंतर्गत बुधवार पर्यंत विभागाने18 लाख 62 हजार किलोमीटरचे अंतर गाठले. या दरम्यान एसटी महामंडळाने तब्बल 6 कोटी 71 लाखांचे उत्पन्न मिळवले.
सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकार ने महिलांसाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यानंतर एसटीच्या बस मध्ये प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत आहे. 65 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील तिकिटात सवलत दिली आहे तर 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बस प्रवास मोफत आहे. या मुळे एसटी महामंडळात कोल्हापूरच्या विभागात उत्पन्न वाढले आहे.
Edited by – Priya Dixit
दिवाळीत एसटी महामंडळ कोल्हापूरच्या विभागात कोल्हापूरहून पुणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव, लातूर, कोकण जिल्ह्यासाठी प्रवाशांसाठी ग्रामीण भागात जाण्यासाठी 9नोव्हेंबर पासून विशेष बस सोडण्यात आल्या आहे. या अंतर्गत बुधवार पर्यंत विभागाने18 लाख 62 हजार …